Ambati Rayudu Retirement Tweet, IPL 2022: 'हे माझं शेवटचं IPL' म्हणणाऱ्या अंबाती रायडूची क्षणार्धात पलटी? आधी केलं ट्वीट मग केलं डिलीट

अंबाती रायडूने मुंबई इंडियन्स अन् चेन्नई सुपर किंग्जचं केलं प्रतिनिधित्व

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2022 01:43 PM2022-05-14T13:43:21+5:302022-05-14T14:30:52+5:30

whatsapp join usJoin us
Mumbai Indians CSK Cricketer Ambati Rayudu will retire from IPL 2022 after this season see Tweet | Ambati Rayudu Retirement Tweet, IPL 2022: 'हे माझं शेवटचं IPL' म्हणणाऱ्या अंबाती रायडूची क्षणार्धात पलटी? आधी केलं ट्वीट मग केलं डिलीट

Ambati Rayudu Retirement Tweet, IPL 2022: 'हे माझं शेवटचं IPL' म्हणणाऱ्या अंबाती रायडूची क्षणार्धात पलटी? आधी केलं ट्वीट मग केलं डिलीट

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Ambati Rayudu Retirement Tweet, IPL 2022: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) या दोन संघांकडून दमदार IPL कारकीर्द घडवणारा अंबाती रायडू याने क्रिकेटला रामराम ठोकला. अंबाती रायडूने आपल्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरून माहिती दिली. 'हे माझं शेवटचं आयपीएल असणार आहे. मुंबई आणि चेन्नई या दोन संघांकडून १३ वर्षे मला IPL खेळायला मिळालं. या दोन्ही संघांनी मला खूप काही दिलं आणि खूप शिकवलं. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन संघांचे आभार. माझ्या IPL क्रिकेट प्रवासाला त्यांच्यामुळेच अर्थ आला', अशा शब्दात त्याने क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. पण या ट्वीटनंतर काही क्षणातच त्याने हे ट्वीट डिलीट केल्यामुळे त्याचं मतपरिवर्तन झालं की काय? अशी चर्चा रंगली आहे.

अंबाती रायडू गेली काही वर्षे चेन्नईच्या संघाकडून खेळत आहे. त्यांच्याकडून खेळताना त्याने आक्रमक आणि बचावात्मक अशा दोन्ही पद्धतीचा खेळ करत संघाला अनेक वेळा दमदार कामगिरी करून दिली आहे. चेन्नईच्या संघाला त्याने अनेकदा कठीण प्रसंगात सावरलं आहे. त्यामुळेच अंबाती रायडू चेन्नईच्या संघाचा अविभाज्य घटक आहे. आतापर्यंत अंबाती रायडूने IPL मध्ये १८७ सामने खेळले आहेत. त्यात त्याने २९च्या सरासरीने ४ हजार १८७ धावा केल्या आहेत. १२७च्या स्ट्राईक रेटने गोलंदाजांना चोप देत त्याने स्पर्धेत सर्वाधिक धावसंख्या म्हणून एक शतकही झळकावले होते. रायडूने २०१० ते २०१७ या कालावधीत मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधीत्व केले. त्यावेळी त्याला तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवले जात असे. चेन्नईमध्येही त्याला तिच कामगिरी सोपवण्यात आली होती. आणि त्याने ती कामगिरी यशस्वीरित्या पार पाडली.

दरम्यान,२०१९ च्या वन डे विश्वचषक स्पर्धेत रायडूला टीम इंडियात स्थान मिळाले नाही. त्यानंतर त्याने तडकाफडकी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर गेल्या काही दिवसांत चेन्नईच्या ताफ्यात सर्वत्र अलबेल नाही अशी चर्चा सुरू असतानाच रायडूने अशी घोषणा ट्वीटद्वारे केली. त्यामुळे साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या. त्यानंतर काही वेळात त्याने ते ट्वीट डिलीट केल्यामुळे आता विविध चर्चांना उधाण आले आहे.

Web Title: Mumbai Indians CSK Cricketer Ambati Rayudu will retire from IPL 2022 after this season see Tweet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.