Join us

IPL 2020 : मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आजारी

एका सामन्यात दोन सुपर ओव्हर होण्याची आयपीएलच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ. सामन्यानंतर झालेल्या प्रेझेंटेशनमध्ये रोहित तब्बेत खराब असल्यामुळे आला नाही. त्याच्याऐवजी आलेल्या पोलार्डने रोहित शर्माच्या प्रकृतीची माहिती दिली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2020 08:25 IST

Open in App

दुबई : रविवारी सायंकाळी झालेल्या रोमांचक सामन्यात रोहित शर्माच्यामुंबई इंडियन्स संघाला दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये पराभवाचा धक्का बसला. एका सामन्यात दोन सुपर ओव्हर होण्याची आयपीएलच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ. सामन्यानंतर झालेल्या प्रेझेंटेशनमध्ये रोहित तब्बेत खराब असल्यामुळे आला नाही. त्याच्याऐवजी आलेल्या पोलार्डने रोहित शर्माच्या प्रकृतीची माहिती दिली.

पोलार्ड म्हणाला, ‘पुढील सामन्यासाठी आमच्याकडे चार दिवसांचा अवधी आहे. रोहित शर्मा अस्वस्थ आहे. चिंता करण्याचे कारण नाही, कारण पुढील सामन्यापूर्वी रोहित तंदुरुस्त होईल.’

प्रत्येक धाव महत्वाची असते, हे या सामन्याने दाखवून दिले. एक किंवा दोन धावेला महत्व असतेच. पंजाबने आमच्यापेक्षा सरस खेळ केल्यामुळे सुपर ओव्हरमध्ये त्यांचा विजय झाला. राहुलने पुन्हा एकदा फलंदाजीत दमदार प्रदर्शन केले. मैदान मोठे आणि खेळपट्टी संथ असल्यामुळे आम्ही धावसंख्येचा बचाव करुशकलो असे माझे मत आहे.’ 

टॅग्स :IPL 2020मुंबई इंडियन्सआयपीएलरोहित शर्मा