Join us  

रो-हिटमॅनचा सुपर शो! एकाच षटकात केले २ मोठे रेकॉर्ड; 'मुंबई'साठी कुठल्या ५ हजार धावा

MI vs SRH Live Match Updates : आज मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2023 6:52 PM

Open in App

IPL 2023, Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad Live Marathi । मुंबई : प्लेऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी मुंबई इंडियन्सचा संघ सनरायझर्स हैदराबादचा सामना करत आहे. मुंबईसाठी 'करा किंवा मरा' असलेल्या या सामन्यात हैदराबादने रोहितसेनेची डोकेदुखी वाढवली. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पाहुण्या संघाने २०० धावांची विशाल धावसंख्या उभारली. हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ५ बाद २०० धावा केल्या. प्लेऑफमध्ये जागा निश्चित करण्यासाठी मुंबईला मोठ्या विजयाची गरज आहे. ताबडतोब खेळी करण्याच्या इराद्याने मैदानात उतरलेल्या मुंबईला इशान किशनच्या रूपात (१४) मोठा धक्का बसला. पण कॅमेरून ग्रीनने स्फोटक खेळी करून डाव सावरला, त्याला कर्णधार रोहित शर्माने चांगली साथ दिली.

आयपीएल २०२३ मध्ये धावांसाठी संघर्ष करत असेलल्या हिटमॅनने साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात आपली चमक दाखवली. रोहितने मुंबई इंडियन्ससाठी ५००० धावांचा आकडा पूर्ण केला आहे, याशिवाय त्याने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये ११ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. लक्षणीय बाब म्हणजे ही किमया साधणारा तो सातवा खेळाडू ठरला आहे. एकाच संघासाठी ५ हजार धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या नावाचा समावेश आहे.

रोहित शर्मा मुंबई इंडियन्सकडून ५००० धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आणि ट्वेंटी-२० मध्ये ११ हजार धावा करणारा तो सातवा फलंदाज ठरला. रोहित ३७ चेंडूत ५६ धावा करून बाद झाला. ट्वेंटी-२०त भारताकडून सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

  1. विराट कोहली - ११८६४
  2. रोहित शर्मा - ११००४*
  3. शिखर धवन - ९६४५
  4. सुरेश रैना - ८६५४ 
  5. रॉबिन उथप्पा - ७२७२

 

टॅग्स :रोहित शर्मामुंबई इंडियन्ससनरायझर्स हैदराबादविराट कोहलीटी-20 क्रिकेट
Open in App