Mumbai Indians vs Kolkata Knight Riders, 12th Match : आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील घरच्या मैदानातील पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने टॉस जिंकला आहे. मुंबईतील वानखेडेच्या मैदानात कोलकाताच्या संघाला त्याने फलंदाजीसाठी निमंत्रित केले आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात मोठा बदल करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. रोहित शर्माच्या जागी विल जॅक्सला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली असून रोहित शर्मा इम्पॅक्ट प्लेयरच्या यादीत आहेत. धावांचा पाठलाग करताना तो फलंदाजीसाठी मैदानात उतरणार का? ते पाहण्याजोगे असेल.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
बॅटिंगला तो मैदानात उतरणार का?
मुंबई इंडियन्सच्या संघाकडून पहिल्या दोन सामन्यात रोहित शर्माला लौकिकाला साजेसा खेळ करता आला नव्हता. तो प्लेइंग इलेव्हनचा भाग नसला तरी सामन्याआधी तो खेळाडूंसोबत चर्चा करताना दिसला. त्यामुळे घरच्या मैदानात तो बॅटिंगला येईल अशी अपेक्षा आहे. मुंबई इंडियन्सच्या संघाकडून रायन रिकल्टनसह विल जॅक्स डावाची सुरुवात केल्याचेही पाहायला मिळू शकते.
IPL 2025 MI vs KKR : फिरकीचं 'चक्रव्यूह' भेदण्याची क्षमता असणारे 'मिस्टर 360 डिग्री'वाले 'ब्रह्मास्त्र'
रोहित शर्माशिवाय इम्पॅक्ट प्लेयरच्या रुपात मुंबई इंडियन्सकडून कॉर्बिन बॉश (Corbin Bosch), राज बावा, रॉबिन मिंझ आणि सत्यनारायण राजू यांचा समावेश आहे. ही यादी पाहिली तर मुंबई इंडियन्सचा संघ इम्पॅक्ट प्लेयरच्या रुपात बॅटिंगसाठी रोहित शर्मावरच डाव खेळेल असे वाटते. पण तो कोणत्या क्रमांकावर खेळणार तेही पाहण्याजोगे असेल.