दुनिया हिला देंगे...! टी-२० मध्ये 'त्रिशतकी' टप्पा गाठत MI नं रचला इतिहास; पाक संघाचा रेकॉर्ड धोक्यात

MI नं IPL सह CLT20 स्पर्धेतील सामन्यासह गाठला मैलाचा पल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2026 20:37 IST2026-03-29T20:26:19+5:302026-03-29T20:37:52+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Mumbai Indians become first-ever franchise to hit 300 mark during IPL 2026 clash against KKR Now Eyes On Pakistan Cricket Team World Record | दुनिया हिला देंगे...! टी-२० मध्ये 'त्रिशतकी' टप्पा गाठत MI नं रचला इतिहास; पाक संघाचा रेकॉर्ड धोक्यात

दुनिया हिला देंगे...! टी-२० मध्ये 'त्रिशतकी' टप्पा गाठत MI नं रचला इतिहास; पाक संघाचा रेकॉर्ड धोक्यात

Mumbai Indians Record : मुंबई इंडियन्सच्या संघाने आयपीएल २०२६ स्पर्धेतील १९ व्या हंगामातील पहिल्याच सामन्यात इतिहास रचला आहे. मुंबईतील वानखेडेच्या स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यासह  मुंबई इंडियन्सच्या संघाने यंदाच्या आपल्या मोहिमेची सुरुवात केली. घरच्या मैदानातील हा सामना MI साठी  ३०० वा सामना आहे.  यासह टी-२० क्रिकेटमध्ये ३०० सामने खेळणारा मुंबई इंडियन्स हा पहिला फ्रँचायझी संघ ठरला आहे.  

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

MI नं IPL सह CLT20 स्पर्धेतील सामन्यासह गाठला मैलाचा पल्ला

पाच वेळचा IPL विजेता असलेल्या मुंबई इंडियन्सच्या संघाने आयपीएलमध्ये हा २७८ वा सामना आहे. याशिवाय मुंबई फ्रँचायझी संघाने चॅम्पियन्स लीग टी-२० स्पर्धेत (CLT20 स्पर्धेत) २२ सामने खेळले आहेत. फ्रँचायझी स्तरावर मुंबई इंडियन्स हा त्रिशतकी डाव साधणारा पहिलाच संघ आहे. मात्र याआधी MI शिवाय दोन संघांनी हा आकडा पार केला आहे. यात पाकिस्तान राष्ट्रीय संघासह सॉमरसेट काउंटी क्रिकेट क्लब संघाचा समावेश आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत प्रत्येकी ३०३ सामने खेळल्याचा रेकॉर्ड आहे. यंदाच्या आयपीएल हंगामात MI च्या संघाला पाकिस्तानचा विक्रम मोडण्याची संधी आहे. 

MI च्या प्लेइंग इलेव्हनमधून सूर्या OUT; रोहितच्या साथीला 'या' गड्याला संधी! KKR कडून दोघांचे पदार्पण

टी-२० मध्ये सर्वाधिक सामने खेळणारे संघ

  • पाकिस्तान क्रिकेट संघ – ३०३ सामने
  • सॉमरसेट काउंटी क्रिकेट क्लब – ३०३ सामने
  • मुंबई इंडियन्स – ३००* सामने
  • हॅम्पशर काउंटी क्रिकेट क्लब – २९६ सामने
  • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु – २८७ सामने
     

IPL मधील सर्वात यशस्वी संघ आहे MI

आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून  मुंबई इंडियन्स या स्पर्धेचा भाग आहे. २०१३ मध्ये IPL ची पहिली ट्रॉफी जिंकल्यावर २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० मध्ये MI नं आयपीएलचे जेतेपद पटकावले होते. या सर्व ट्रॉफी MI फ्रँचायझी संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली जिंकल्या होत्या. मागील ६ वर्षातील दुष्काळ संपवून यंदा जेतेपदाचा षटकार मारण्याच्या इराद्याने मुंबई इंडियन्सचा संघ मैदानात उतरला आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली संघ हा डाव साधणार का? ते पाहण्याजोगे असेल.   

Web Title : मुंबई इंडियंस ने रचा इतिहास, आईपीएल में पाकिस्तान का टी20 रिकॉर्ड खतरे में।

Web Summary : मुंबई इंडियंस 300 टी20 मैच खेलने वाली पहली फ्रैंचाइज़ी बनी। उनका लक्ष्य इस आईपीएल सीज़न में पाकिस्तान के 303 मैचों के रिकॉर्ड को तोड़ना है, 5 आईपीएल खिताब जीतने के बाद।

Web Title : Mumbai Indians create history, eye Pakistan's T20 record in IPL.

Web Summary : Mumbai Indians became the first franchise to play 300 T20 matches. They aim to surpass Pakistan's record of 303 matches in this IPL season, after winning 5 IPL titles.