भारतीय टी-२० संघाचा कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादव सध्या टी-२० विश्वचषकाच्या मैदानात धावांचा पाऊस पाडत असतानाच, दुसरीकडे त्याच्या वैयक्तिक आयुष्यातून एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली. सूर्यकुमारची पत्नी देविशा शेट्टी हिने मुंबईतील देवनार भागात ७.१८ कोटी रुपयांचे एक आलिशान अपार्टमेंट खरेदी केले आहे. सूर्यकुमारच्या पत्नीने देवनारमध्ये घर घेतल्याने त्याच्या चाहत्यांचाही खूप आनंद झाला आहे.
सीआरई मॅट्रिक्स'ने मिळवलेल्या मालमत्ता नोंदणी कागदपत्रांनुसार, देविशाने मुंबईतील देवनार येथील गोदरेज स्काय टेरेसेस या प्रीमियम प्रकल्पात १५०० चौरस फुटांचा फ्लॅट आपल्या नावे केला. विशेष म्हणजे, यादव कुटुंबाचे या इमारतीतील हे तिसरे अपार्टमेंट आहे.
या व्यवहारासाठी देविशाने ३५.९० लाख रुपयांची स्टॅम्प ड्युटी आणि ३०,००० रुपयांचे नोंदणी शुल्क भरले आहे. हे नवीन अपार्टमेंट १८ व्या मजल्यावर असून, त्यासोबत दोन हक्काच्या पार्किंग जागाही मिळाल्या आहेत. यापूर्वी २०२५ मध्ये देविशाने याच इमारतीच्या १७ व्या आणि १८ व्या मजल्यावर दोन अपार्टमेंट खरेदी केले होते. २० फेब्रुवारी २०२६ रोजी या तिसऱ्या घराची अधिकृत नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली.
टीम इंडियाचा उपांत्य फेरीचा मार्ग खडतर
एकिकडे रिअल इस्टेटमध्ये सूर्यकुमारची घोडदौड सुरू असताना, दुसरीकडे क्रिकेटच्या मैदानावर भारतासाठी कठीण आव्हान उभे राहिले आहे. भारत आणि श्रीलंका येथे सुरू असलेल्या २०२६ टी-२० विश्वचषकात भारताने गट साखळीत पाकिस्तानचा ६१ धावांनी धुव्वा उडवत चारही सामने जिंकले होते. मात्र, सुपर-८ फेरीची सुरुवात भारतासाठी धक्कादायक ठरली आहे. पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा ७६ धावांनी पराभव केला. या पराभवामुळे टीम इंडियाचा उपांत्य फेरीचा मार्ग खडतर झाला आहे. कर्णधार या नात्याने आता सूर्यकुमारला पुढच्या सामन्यांमध्ये चमत्कार करून दाखवावा लागणार आहे.
Web Summary : While Suryakumar shines in T20 World Cup, his wife, Devisha, bought a ₹7.18 crore Mumbai apartment. This 1500 sq ft flat is their family's third in the building. India faces tough semi-final challenges after a loss to South Africa.
Web Summary : सूर्यकुमार टी20 विश्व कप में चमक रहे हैं, वहीं उनकी पत्नी देविशा ने ₹7.18 करोड़ का मुंबई अपार्टमेंट खरीदा। 1500 वर्ग फुट का यह फ्लैट इमारत में उनके परिवार का तीसरा फ्लैट है। दक्षिण अफ्रीका से हार के बाद भारत को सेमीफाइनल में कड़ी चुनौती का सामना करना पड़ रहा है।