वानखेडेवरील स्टँडला शरद पवारांचं नाव; रोहित शर्मा आणि अजित वाडेकर यांनाही मोठा सन्मान!

Mumbai Cricket Association: मुंबईच्या वानखेडे मैदानात आता शरद पवार यांच्यासह रोहित शर्मा आणि अजित वाडेकर यांच्या नावाचे स्टँड दिसणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 18:14 IST2025-05-16T18:11:09+5:302025-05-16T18:14:03+5:30

whatsapp join usJoin us
Mumbai Cricket Association Inaugurates Rohit Sharma, Sharad Pawar and Ajit Wadekar Stand In Wankhede Stadium | वानखेडेवरील स्टँडला शरद पवारांचं नाव; रोहित शर्मा आणि अजित वाडेकर यांनाही मोठा सन्मान!

वानखेडेवरील स्टँडला शरद पवारांचं नाव; रोहित शर्मा आणि अजित वाडेकर यांनाही मोठा सन्मान!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर भारताचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या नावाचे स्टँड दिसणार आहे. या भव्य सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांनाही मोठा सन्मान मिळाला आहे. वानखेडे स्टेडियममध्ये रोहित शर्मासहशरद पवार आणि अजित वाडेकर यांच्याही नावाचे स्टँड पाहायला मिळणार आहे. या खास कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उपस्थिती दर्शवली. 

दरम्यान, रोहित शर्मा हा भारताच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने नुकतेच आयसीसी टी-२० विश्वचषकावर नाव कोरले. रोहित शर्माच्या अभूतपूर्व योगदानाची आणि क्रिकेटमधील त्यांच्या उल्लेखनीय कारकिर्दीची दखल घेण्यासाठी एमसीएकडून त्याला हा सन्मान देण्यात आला. वानखेडे स्टेडियमवरील पॅव्हेलियनच्या तिसऱ्या लेव्हलला रोहितचे नाव देण्यात आले. वानखेडे स्टेडियममध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांच्यासह अनेक दिग्गज क्रिकेटपटूंच्या नावावर स्टँड आहेत. या यादीत आता रोहित शर्माचे नाव जोडले गेले आहे.

वानखेडे स्टेडियमवरील ग्रँड स्टँड लेव्हल ३ आता शरद पवारांच्या नावाने ओळखले जाणार आहे. शरद पवारांनी २००१ ते २०१३ दरम्यान एमसीएचे अध्यक्ष भूषवले आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळात मुंबई क्रिकेटचे आधुनिकीकरण केले. दरम्यान, २०११ मध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात वानखेडे मैदानावर एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला गेला. एवढेच नाही तर शरद पवारांनी बीसीसीआय आणि आयसीसीचे अध्यक्षपदाही भूषवले आहे.

अजित वाडेकर यांनी १९६६ ते १९७४ दरम्यान ३७ कसोटी आणि दोन एकदिवसीय भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले.याशिवाय, त्यांनी १९५८ ते १९५९ दरम्यान प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले. ऑगस्ट २०१८ मध्ये वयाच्या ७७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Web Title: Mumbai Cricket Association Inaugurates Rohit Sharma, Sharad Pawar and Ajit Wadekar Stand In Wankhede Stadium

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.