Join us

Mukesh Choudhary Super Swing Axar Patel Wicket Video: सुपर स्विंग! चेंडू टप्पा पडताच आत वळला अन् अक्षर पटेल बघतच राहिला...

स्टंपवरील बेल्स उडल्यानंतर धोनीने झेप घेत पकडला चेंडू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 17:57 IST

Open in App

Mukesh Choudhary Super Swing Axar Patel Wicket Video: चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने दिल्ली विरूद्धच्या सामन्यात रविवारी ९१ धावांनी दणदणीत विजय मिळवला. सलामीवीर डेवॉन कॉनवेच्या ८७ धावा आणि ऋतुराज गायकवाडच्या ४१ धावांच्या जोरावर CSK ने द्विशतकी मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीच्या संघाचा डाव ११७ धावांतच आटोपला. दिल्लीच्या संघाची अवस्था अतिशय वाईट होती. तशातच अष्टपैलू खेळीसाठी ओळखला जाणारा अक्षर पटेल याची विकेट खास चर्चेचा भाग ठरली.

२०९ धावांचा पाठलाग करताना दिल्लीची अवस्था १० षटकांत ५ बाद ८२ होती. अक्षर पटेलकडून चांगल्या खेळाची अपेक्षा होती. मुकेश चौधरीच्या गोलंदाजीच्या वेळी अक्षर पटेलने फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पण मुकेशने केलेला इनस्विंग अक्षरला कळलाच नाही. चेंडू टप्पा पडून आत वळताच अक्षर क्लीन बोल्ड झाला. चेंडू इतका वेगात होता की धोनीला उडी मारून झेल टिपला. पण अक्षर मात्र त्याआधीच त्रिफळाचीत झाला होता.

इन स्विंगर चेंडूवर अक्षर पटेल क्लीन बोल्ड; पाहा व्हिडीओ-

दरम्यान, प्रथम फलंदाजी डेवॉन कॉनवेने ४९ चेंडूत ८७ धावा केल्या. तर ऋतुराज गायकवाडने ३३ चेंडूत ४१ धावा केल्या. या दोघांनी दमदार सलामी दिली. तसेच शेवटच्या टप्प्यात शिवम दुबेने १९ चेंडूत ३२ धावा करत संघाला २०८ धावांपर्यंत मजल मारून दिली. आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीकडून सर्वाधिक धावा मिचेल मार्शने केल्या. तो २० चेंडूत २५ धावा काढून माघारी परतला. त्याशिवाय, शार्दूल ठाकूरने १९ चेंडूत २१ तर रिषभ पंतने ११ चेंडूत २१ धावांची खेळी केली. पण अखेर त्यांना ९१ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

 

टॅग्स :आयपीएल २०२२अक्षर पटेलचेन्नई सुपर किंग्सदिल्ली कॅपिटल्समहेंद्रसिंग धोनी
Open in App