Join us  

Mukesh Ambani वडिलांना म्हणाले होते,"तुमच्या मुलांची काळजी करू नका"; Hardik Pandya नं सांगितला किस्सा 

हार्दिक पांड्याच्या यशात भारतीय क्रिकेट टीमसह IPL फ्रेन्चायझी Mumbai Indians चादेखील तितकाच मोठा वाटा आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 2:46 PM

Open in App
ठळक मुद्देहार्दिक पांड्याच्या यशात भारतीय क्रिकेट टीमसह IPL फ्रेन्चायझी Mumbai Indians चादेखील तितकाच मोठा वाटा आहे. 

भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू हर्दिक पांड्या (Hardik Pandya) यानं नुकतीच एक मुलाखत दिली होती. यामध्ये त्यांनी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) या संघाचे मालक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) याच्याबाबत मनमोकळेपणाने गोष्टी शेअर केल्या. "मुकेश सरांनी एक दिवस माझ्या वडिलांना भेटण्यास बोलालं आणि तुमच्या मुलांची काळजी करू नका, आता ती माझी मुलं आहेत," असं सांगितल्याचं हार्दिक म्हणाला. त्यांची ही गोष्ट ऐकून माझे वडील भावूक झाले होते, असंही तो म्हणाला.

"एकदा कोणीतरी मला येऊन सांगितलं मुकेश तुला आणि क्रुणालला बोलावलं आहे. कारण अमिताभ बच्चन यांना तुमची भेट घ्यायची आहे. त्यावेळी आम्ही सोबत माझ्या वडिलांनाही घेऊन गेलो. त्यावेळी अमिताभ बच्चन यांनी आम्ही भारताचं नाव उंचावलं असं म्हटलं. त्यावेळी माझ्या वडिलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता," असं हार्दिकनं सांगितलं.हार्दिक पांड्या सुरूवातीपासूनच मुंबई इंडियन्स या संघाचा भाग आहे. मुंबईच्या टीमनं IPL २०१५ मध्ये १० लाख रूपयांमध्ये आपल्या संघात सामील केलं होतं. त्यानंतर २०१८ मध्ये मुंबई इंडियन्सनं त्याला संघात कायम ठेवण्यासाठी तब्बल ११ कोटी रुपये मोजले होते. 

टॅग्स :मुकेश अंबानीहार्दिक पांड्याआयपीएल २०२१मुंबई इंडियन्स
Open in App