Join us

एमएसके प्रसाद होणार करोडपती

बीसीसीआयने नुकतीच निवड समितीच्या मानधनात भरघोस वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे आता प्रसाद यांना प्रतिवर्षी एक कोटी रुपये मिळणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2018 14:50 IST

Open in App
ठळक मुद्देनिवड समिती सदस्य शरणदीप सिंग आणि देवांग गांधी यांच्या मानधनात ३० लाख रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद आता करोडपती झाले आहेत.   बीसीसीआयने नुकतीच निवड समितीच्या मानधनात भरघोस वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे आता वर्षाला प्रसाद यांना एक कोटी रुपये मिळणार आहे.

बीसीसीआयने सर्वच निवड समितींच्या मानधनात भरघोस वाढ केली आहे. यापूर्वी प्रसाद यांना वर्षाला ८० लाख रुपये मानधन मिळत होते, त्यांच्या मानधनात २० लाखांची वाढ येणार आहे. निवड समिती सदस्य शरणदीप सिंग आणि देवांग गांधी यांच्या मानधनात ३० लाख रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे या दोघांचे मानधन आता ९० लाख रुपये एवढे होणार आहे.

भारतीय महिला संघाच्या निवड समिती सदस्यांना आता वर्षाला २५ लाख एवढे मानधन मिळणार आहे, तर निवड समिती अध्यक्षांना ३० लाख रुपये एवढे मानधन मिळणार आहे. कनिष्ट संघाच्या निवड समिती सदस्यांच्या मानधनातही यावेळी चांगली वाढ करण्यात आली आहे, त्यांना आता वर्षाला ६० लाख रुपये मिळतील. या निवड समितीच्या अध्यक्षांना आता ६५ लाख रुपये मानधन मिळणार आहे.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघबीसीसीआय