इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात हाय-प्रोफाइल ट्रेड येत्या काही दिवसांत पाहायला मिळू शकतो. राजस्थान रॉयल्सचा (RR) कर्णधार आणि विकेटकीपर-बॅटर संजू सॅमसन (Sanju Samson) याला आपल्या संघात घेण्यासाठी चेन्नई सुपर किंग्जचा संघ (CSK) रवींद्र जडेजासह सॅम करन यांचा ट्रेडच्या माध्यमातून मोठा डाव खेळणार आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
जड्डू-संजूच्या चर्चित मुद्यावर कैफनं घेतलं MS धोनीचं नाव
आयपीएलच्या आगामी हंगामासंदर्भात चर्चित मुद्द्यावर मोहम्मद कैफनं मोठे वक्तव्य केले आहे. महेंद्रसिंह धोनी संघ हितासाठी कोणताही निर्णय घेण्यास मागे पडणार नाही, हे सांगताना तो रवींद्र जडेजाचा त्याग करायलाही तो तयार होईल, असे कैफ म्हणाला आहे. एवढेच नव्हे तर संजू संघात आला तर येत्या काळात तो CSK संघाच नेतृत्व करताना दिसेल, अशी भविष्यवाणीही त्याने केली आहे.
CSK ‘खिडकी’तून बाहेर काढणार असल्याची चर्चा! त्यातच जड्डू Insta वरून ‘गायब’
काय म्हणाला मोहम्मद कैफ?
टीम इंडिया माजी क्रिकेटर मोहम्मद कैफ याने आपल्या युट्यूब चॅनेलवरील खास शोमध्ये सध्याच्या चर्चित IPL विंडो ट्रेडसंदर्भात भाष्य केले. तो म्हणाला की, जर महेंद्रसिंह धोनी आगामी आयपीएलमध्ये मैदानात उतरणार असेल तर त्याचे ध्येय हे संघाला जेतेपद मिळवून देण्याचे असेल. धोनी स्वाभिमानी आहे, संघ हितासाठी तो कोणताही कठोर निर्णय घेऊ शकतो. धोनी मैत्रीच्या आधारावर निर्णय घेतो, त्यामुळे काही खेळाडूंना अतिरिक्त संधी मिळते, अशी चर्चा रंगते. पण याचा अर्थ असा अजिबात नाही की. त्यांचे लक्ष जिंकण्यापासून दूर जाते. गरज पडल्यास तो रवींद्र जडेजाचा त्याग करायलाही तयार होईल.
...तर संजू सॅमसन CSK चा कर्णधारही होईल
कदाचित संजू सॅमसन आणि धोनी यांच्यात आगामी ट्रेडआधी चर्चाही झाली असेल. जर संजू सॅमसन चेन्नई सुपर किंग्जच्या संघात आला तर तो भविष्यात या संघाचे कर्णधारपदाचा प्रमुख दावेदारही ठरेल. याचा अर्थ धोनीसाठी २०२६ चा हंगाम शेवटचा ठरू शकतो, असे संकेतही मिळतील, ही गोष्टही मोहम्मद कैफनं बोलून दाखवली आहे.