Join us

MS Dhoni ने अनोख्या पद्धतीने केलं नववर्षाचं स्वागत, नंतर पत्नी साक्षीसोबत केला धमाल डान्स

MS Dhoni New Year Celebration 2025: धोनीने कुटुंबासोबत नवीन वर्ष साजरे केले. सोशल मीडियावर त्या सेलिब्रेशनचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 18:20 IST

Open in App

MS Dhoni New Year Celebration 2025: जगभरात नववर्ष मोठ्या थाटामाटात साजरे करण्यात आले. मध्यरात्री लोक 2024 ला निरोप देतात आणि 2025 चे मोठ्या उत्साहात स्वागत करतात. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीही नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये मग्न होता. धोनीने कुटुंबासोबत नवीन वर्ष साजरे केले. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तो मध्यरात्री नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये मग्न होताना दिसत आहे. त्याच्यासोबत त्याची मुलगी झिवा धोनीही दिसत आहे. याशिवाय तो पत्नी साक्षी धोनीसोबत डान्स करतानाही दिसला.

धोनीने अनोख्या पद्धतीने केलं नववर्षाचं स्वागत

महेंद्रसिंग धोनीचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो नवीन वर्ष साजरा करताना दिसत आहे. आजकाल धोनी आपल्या कुटुंबासह गोव्यात आहे. सध्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये धोनी हॉट एअर बलून उडवताना दिसत आहे. हे सोडताना धोनीही हसत एन्जॉय करताना दिसतोय. यावेळी त्याची मुलगी झिवा धोनीजवळ उभी आहे. याशिवाय धोनीच्या आजूबाजूला अनेक लोक पाहायला मिळत आहेत.

धोनीचा पत्नी साक्षीसोबत डान्स

धोनीने २०२४चे दुबईत स्वागत केले. तर यावर्षी तो आपल्याच देशात आहे. नववर्षानिमित्त धोनीने पत्नी साक्षी धोनीसोबत जोरदार डान्सही केला. आणखी एका व्हिडिओमध्ये धोनी आणि साक्षी इतर लोकांसोबत डान्स करताना दिसले. धोनीचे दोन्ही व्हिडिओ सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांना खूप आवडत आहेत.

धोनी IPL 2025 मध्ये दिसणार

धोनीने २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, पण तो आयपीएल खेळत आहे. ४३ वर्षांचा धोनी IPL 2025 मध्येही खेळताना दिसणार आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जला पाच वेळा आयपीएल विजेतेपद मिळाले आहे. त्याने IPL 2024 मध्ये २२० च्या स्ट्राइक रेटने १६१ धावा केल्या होत्या.

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीव्हायरल फोटोज्सोशल मीडियाऑफ द फिल्ड