Join us
Daily Top 2Weekly Top 5

धो धो धोनी ठो ठो गोळ्या झाडतो तेव्हा... व्हिडीओ व्हायरल

एम.एस. धोनीने पोलिसांचं, जवानांचं शस्त्र असलेली बंदुकही तितक्याच ताकदीने चालवून चाहत्यांना थक्क केलं आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2018 21:30 IST

Open in App

नवी दिल्लीः 'कॅप्टन कूल' म्हणून ओळखला जाणारा महेंद्रसिंह धोनी आपल्या बॅटचा शस्त्र म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्याचा कसा पाडाव करतो, हे आपण पाहिलं आहेच. पण, याच धोनीने पोलिसांचं, जवानांचं शस्त्र असलेली बंदुकही तितक्याच ताकदीने चालवून चाहत्यांना थक्क केलं आहे.  महेंद्रसिंह धोनीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. 'जाहिरातीच्या शूटिंगपेक्षा बंदुकीने  शूटिंग करण्यात वेगळीच मजा आहे', असा मेसेजही त्यानं लिहिलाय. ३० सेकंदांच्या या व्हिडीओत धोनीनं १५ गोळ्या झाडल्या आहेत. त्यातल्या काहींनी अचूक लक्ष्य भेदलं, तर काही नेम चुकलेत. 

आयपीएल स्पर्धेत महेंद्रसिंह धोनी चेन्नईचं नेतृत्व करतोय. या व्यग्र वेळापत्रकातूनही तो आपल्या छंदांसाठी वेळ काढतो. साहसी खेळांबद्दलचं त्याचं प्रेम तर सर्वश्रुतच आहे. त्याचाच प्रत्यय या नेमबाजीतून पुन्हा आला. त्याचे हे पराक्रम पाहूनच त्याला मानद लेफ्टनंट कर्नल ही उपाधीही देण्यात आली आहे. हा युनिफॉर्म परिधान करूनच त्यानं 'पद्मभूषण' पुरस्कार स्वीकारला होता.

टॅग्स :महेंद्रसिंह धोनीसोशल मीडिया