रणवीर सिंगने धोनीच्या मुलीचा गॉगल घातला, अन्....

लहान मुलं कधी काय बोलतील आणि त्यांची कल्पनाशक्ती नक्की कुठे चालेला याचा काही नेम नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2019 10:38 IST2019-10-08T10:37:56+5:302019-10-08T10:38:25+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
MS Dhoni takes sly dig at Ranveer Singh for wearing Ziva's sunglasses  | रणवीर सिंगने धोनीच्या मुलीचा गॉगल घातला, अन्....

रणवीर सिंगने धोनीच्या मुलीचा गॉगल घातला, अन्....

लहान मुलं कधी काय बोलतील आणि त्यांची कल्पनाशक्ती नक्की कुठे चालेला याचा काही नेम नाही. याची प्रचिती प्रत्येक आई वडिलांना आली असेलच, मग त्याला माजी कर्णधार महेंद्रसिंग अपवाद कसा ठरेल. कॅप्टन कूल धोनीनं मंगळवारी इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला. त्यात झिवा आणि बॉलिवूड सुपरस्टार रणवीर सिंग दिसत आहेत. या दोघांच्या फोटोत त्यांनी घातलेला चष्मा एकसारखा दिसत आहे. त्यावरूनच घडलेला एक प्रसंग धोनीनं इंस्टावर शेअर केला आहे.  

वर्ल्ड कप स्पर्धेनंतर धोनी क्रिकेटपासून दूर आहे. त्यानं वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका मालिकेतून विश्रांती घेतली आहे आणि नोव्हेंबरपर्यंत तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतण्याची शक्यताही कमीच आहे. त्यामुळे तो आता संपूर्णवेळ कुटुंबीयांना देत आहे. त्यामुळेच असे किस्से त्याच्या रोजच वाट्याला येत आहेत. त्यापैकी एक किस्सा त्यानं मंगळवारी शेअर केला. रणवीर सिंग हा त्याच्या अनोख्या स्टाईलमुळे नेहमी चर्चेत असतो. चित्रविचित्र कपड्यांची त्याची स्टाईल नेहमी चर्चेत राहिली आहे. आता त्याचा गॉगल चर्चेत आहे. झिवाच्या स्टाईलमधून प्रेरणा घेत रणवीरनं तो गॉगल घातल्याचा दावा धोनीच्या मुलीनं केला आहे.

धोनीनं लिहिले की,''रणवीरचा फोटो पाहिल्यानंतर त्यानं तिचा गॉगल का घातला, असा प्रश्न झिवाला पडला होता. पण, ती तिच्या खोलीत गेली आणि स्वतःचा गॉगल शोधून आणला. आताची पोरं काय विचार करतील याचा नेम नाही. साडेचार वर्षांचा असताना मला हे कळलेही नसते. जेव्ही ती रणवीरला भेटेल तेव्हा त्याला याबद्दल नक्की विचारेल.'' 


 
तब्बल दोन महिन्यांनंतर धोनी घरी परतला; वाट पाहत होती 'ही' खास गाडी
भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार धोनी तब्बल दोन महिन्यांनी आज घरी परतल्याचे पाहायला मिळाले. धोनी सध्याच्या भारतीय संघात नाही, पण तरीही दोन महिने तो घराबाहेर होता. पण घरी परतल्यावर एका महागड्या गाडीत बसल्याचे पाहायला मिळाले आहे. दोन महिन्यांनंतर धोनी घरी गेल्यावर त्याचे कुटुंबिय तर वाट पाहत होतेच. पण एक खास गाडी त्याची वाट पाहत होती. धोनीने काही दिवसांपूर्वी एक गाडी बूक केली होती. धोनीच बाईक्स आणि कारवरील प्रेम हे जगजाहीर आहे. त्यामुळे ही नवीन जीप धोनीच्या घरी दाखल झाली, त्यावेळी साक्षीला माहीची आठवण आली. तिनं या नवीन सदस्याचे स्वागत केले आणि missing you माही अशी पोस्ट सोशल मीडियावर टाकली. धोनीच्या ताफ्यात दाखल झालेल्या या जीपची किंमत ही जवळपास 79 लाख इतकी आहे. त्यामुळे आज घरी गेल्यावर माहिने या गाडीतून सैर केल्याचे पाहायला मिळाले.

Web Title: MS Dhoni takes sly dig at Ranveer Singh for wearing Ziva's sunglasses 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.