Join us

MS Dhoni in England: टीम इंडियाची टेस्ट मॅच सुरू असताना धोनी अचानक इंग्लंडमध्ये, कारण...

धोनीची पत्नी साक्षी हिने पोस्ट केला फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2022 09:16 IST

Open in App

MS Dhoni in England, IND vs ENG 5th Test: भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. भारत-इंग्लंड यांच्यात गेल्या वर्षी शिल्लक राहिलेला पाचवा कसोटी सामना खेळवला जात आहे. या सामन्यात पहिल्या दोन दिवसांचा खेळ पूर्ण झाला असून त्यावर भारताचे वर्चस्व दिसून आले आहे. अशातच टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा अचानक इंग्लंडमध्ये दाखल झाल्याने साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या. टीम इंडियाचा दौरा आणि धोनीची इंग्लंड वारी यामागे काही खास कारण आहे की काय अशा चर्चाही सुरू झाल्या.

धोनी इंग्लंडला पोहोचल्याचा फोटो पत्नी साक्षी धोनीने शेअर करताच सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना त्याची झलक पाहण्याची संधी मिळाली. वृत्तानुसार, धोनी पत्नी साक्षीसोबत लंडनला पोहोचला आहे. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी चाहत्यांच्या मनात त्याची क्रेझ अजूनही आहे. साक्षीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये धोनीचा फोटो शेअर केला आहे. पत्नी साक्षीने शेअर केलेल्या फोटोत धोनीने निळा शर्ट, काळी जीन्स आणि गडद निळ्या रंगाचे जॅकेट घातले आहे. हा फोटो सोशल मीडियावर आल्यानंतर व्हायरल व्हायला वेळ लागला नाही. धोनीने क्रिकेट खेळणे बंद केले असले तरी तो चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. त्याची फॅन फॉलोइंग अजिबात कमी झालेली नाही. पण धोनीच्या इंग्लंड वारीमागे कारण काय, असा प्रश्न चाहत्यांना पडल्याचे दिसते.

धोनीच्या इंग्लंड वारीमागचं रहस्य काय?

महेंद्रसिंग धोनीचा ४१वा वाढदिवस जवळ आला आहे. ७ जुलैला धोनीचा ४१ वा वाढदिवस आहे. याशिवाय धोनी काही काळ गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त आहे. त्यामुळे इंग्लंड वारीचा त्याच्या उपचाराशी संबंध असल्याचीही शक्यता आहे. मात्र महेंद्रसिंग धोनी लंडनला नक्की कोणत्या कारणासाठी आला आहे, त्याच्या या इंग्लंड भेटीमागे कारण काय आहे नक्की स्पष्ट झालेले नाही.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडमहेंद्रसिंग धोनीभारतीय क्रिकेट संघइंग्लंड
Open in App