Join us

धोनीने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस यावे : गौतम गंभीर

वर्षभरापासून व्यावसायिक क्रिकेटपासून दूर असलेल्या धोनीने जास्तीत जास्त चेंडू खेळण्याचा प्रयत्न करायला हवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2020 06:41 IST

Open in App

नवी दिल्ली : इंडियन प्रीमिअर लीगमधून सुरेश रैनाने माघार घेतल्यानंतर चेन्नई सुपरकिंग्सने महेंद्रसिंग धोनीला फलंदाजीसाठी तिसºया क्रमांकावर खेळवायला हवे, असे मत भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने व्यक्त केले.रैनाने वैयक्तिक कारणांमुळे आयपीएलमधून माघार घेतली. वर्षभरापासून व्यावसायिक क्रिकेटपासून दूर असलेल्या धोनीने जास्तीत जास्त चेंडू खेळण्याचा प्रयत्न करायला हवा, असे गंभीरला  वाटते. स्टार स्पोटर्््सच्या ‘क्रिकेट कनेक्टेड’शोमध्ये बोलताना गंभीर म्हणाला,‘महेंद्रसिंग धोनीसाठी तिसºया क्रमांकावर फलंदाजी करण्याची ही उत्तम संधी आहे. ’दोन वर्षे आयपीएलचे जेतेपद पटकावणाºया संघाचा कर्णधार गंभीर म्हणाला,‘धोनी गेल्या वर्षभरापासून क्रिकेटपासून दूर आहे. त्यामुळे त्याने जास्तीत जास्त चेंडू खेळण्याचा प्रयत्न करायला हवा. अशा स्थितीत तो अँकरची भूमिका बजावू शकतो. गेल्या काही वर्षांत तो भारतासाठी अशीच भूमिका बजावत आहे.संघात फिनिशरची भूमिका बजावणाºया अन्य फलंदाजांचा समावेश असल्यामुळे धोनीने तिस-या क्रमांकावर फलंदाजी करायला हवी, असेही गंभीर म्हणाला.

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीगौतम गंभीर