वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं वेस्ट इंडिज दौऱ्यातून आणि मायदेशात झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून विश्रांती घेतली होती. नोव्हेंबर महिन्यापर्यंत तो विश्रांतीवर आहे. क्रिकेटच्या मैदानापासून दूर असलेला धोनी टेनिस कोर्टवर उतरला आणि त्यानं तेथे विजयी पदार्पण केले. झारखंड राज्य क्रिकेट असोसिएशनच्या कंट्री क्रिकेट क्लब टेनिस स्पर्धेत धोनी खेळला आणि तेथे विजयही मिळवला. पण, धोनी पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यानं झारखंड स्टेडियमवर क्रिकेटचा कसून सरावही केला.
वर्ल्ड कप स्पर्धेनंतर धोनीनं वेस्ट इंडिज दौऱ्यातून आणि मायदेशात झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून विश्रांती घेतली होती. नोव्हेंबर महिन्यापर्यंत तो विश्रांतीवर आहे. त्यामुळे त्याच्या निवृत्तीच्या चर्चांना जोर आला. धोनी मैदानात दिसणार की नाही, याबाबत बऱ्याच वावड्या उठत आहेत. त्यामध्ये भारतीय संघाचे निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी धोनीच्या भवितव्याबाबत एक मोठे विधान केले होते. एमएसके प्रसाद यांनी सांगितले की, " विश्वचषकानंतर आमचे विचार स्पष्ट झाले आहेत. आम्ही युवा यष्टीरक्षकांना जास्त संधी देणार आहोत. धोनीच्या मनातही हीच गोष्ट आहे. त्यामुळे आम्ही धोनीऐवजी युवा यष्टीरक्षकांना यापुढे पसंती देणार आहोत."
पण, रिषभ पंत वगळता निवड समितीनं अन्य यष्टिरक्षकाला संधी दिलेली नाही. त्यात पंतही अपयशी ठरत आहे. त्यामुले धोनीला पुन्हा बोलावण्याची मागणी जोर धरत आहे. धोनीनं झारखंड क्रिकेट असोसिएसन स्टेडिमवर कसून सराव करताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कमबॅकचे संकेत दिले.