MS Dhoni Retirement : Yes, Maybe, Definitely not, you’ve decided, not me - महेंद्रसिंग धोनीने निवृत्तीच्या प्रश्नांना दिलेली ही आतापर्यंतची उत्तरं... इंडियन प्रीमिअर लीगमधून धोनी निवृत्त होतोय, ही चर्चा मागील २-३ वर्ष सुरू होती आणि यंदा तो निवृत्त होणारच असा ठाम विश्वास अनेकांनी व्यक्त केला. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सच्या प्रत्येक सामन्यात धोनीचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत. धोनीने यंदाही निवृत्तीच्या चर्चेचा चेंडू टोलवावा, अशी चाहत्यांची इच्छा आहे आणि तशा आशयाचे फलक घेऊन ते स्टेडियमवरही येत आहेत. खरंच यंदाची आयपीएल कॅप्टन कूलची शेवटची स्पर्धा आहे का? धोनीने अद्याप याबाबतच अंतिम निर्णय CSK ला कळवलेला नाही, परंतु त्याच्या निकटवर्तीयांच्या म्हणण्यानुसार धोनी आणखी एक वर्ष खेळण्यासाठी सज्ज झाला आहे.
चेन्नई सुपर किंग्सच्या कर्णधाराचा फॉर्म चांगला सुरू आहे आणि त्याचे षटकार आजही चाहत्यांना मंत्रमुग्ध करत आहेत. तो फलंदाजीला मैदानावरच येताच व्ह्यूअर्सशीप झपाट्याने वाढताना दिसतेय. धोनीच्या निवृत्तीनंतर CSKची जबाबदारी कोणाकडे द्यायची, हे अद्याप फ्रँचायझीने ठरवलेलं नाही. बेन स्टोक्सचं नाव आघाडीवर आहे, परंतु त्याची दुखापत अन् इंग्लंडकडून त्याला पूर्ण हंगाम खेळण्यासाठी मिळणारी परवानगी, हा कळीचा मुद्दा आहेच. रवींद्र जडेजाला पुन्हा कॅप्टन बनवण्याचा विचार केला जाणार नाही, अशा परिस्थितीत अजिंक्य रहाणे हा एक पर्यात त्यांच्यासमोर आहे.
आयपीएलच्या आणखी महत्त्वाच्या बातम्या
जोफ्रा आर्चरने 'इंग्लंड'कडून कधी खेळायचे हे Mumbai Indians ठरवणार; धक्कादायक Report
IPL 2023 : चेन्नईत केवळ MS Dhoni च नव्हे, तर त्याच्या माजी सहकाऱ्याच्या मुलीनेही केलीय हवा
विराट 'मॅम' पण बोल! फोटोग्राफर्सनी अनुष्का शर्माला असं काय म्हटलं की कोहलीने उडवली खिल्ली
मग धोनी केव्हा निवृत्त होईल? हा सध्या आयपीएल वर्तुळातील खूप मोठा प्रश्न आहे. आत्तापर्यंत ज्या प्रकारे गोष्टी घडल्या आहेत, सर्वकाही चेपॉकमधील निरोपाच्या सामन्याकडे किंवा नरेंद्र मोदी स्टेडियमवरील विश्वविक्रमी गर्दीसमोर तो निवृत्ती घेईल असे दिसत आहे. पण धोनीने वेळोवेळी निवृत्तीबाबत खंडन केले आहे आणि निवृत्तीच्या अफवा फेटाळून लावल्या आहेत . सुरेश रैनानेही धोनी यंदा ट्रॉफी जिंकून आणखी एक पर्व खेळण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले होते.