IPL 2023 : चेन्नईत केवळ MS Dhoni च नव्हे, तर त्याच्या माजी सहकाऱ्याच्या मुलीनेही केलीय हवा

ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज फलंदाज मॅथ्यू हेडन याची मुलगी ग्रेसी हेडनचीही आयपीएल २०२३ मध्ये भरपूर चर्चा रंगली आहे.

ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज फलंदाज मॅथ्यू हेडन याची मुलगी ग्रेसी हेडनचीही आयपीएल २०२३ मध्ये भरपूर चर्चा रंगली आहे. तिचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. चेन्नईत तिचे खूप चाहते आहेत.

आयपीएल २०२३ ची क्रेझ सध्या जोरदार आहे. जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीगसाठी परदेशी खेळाडू आणि समालोचकही भारतात दाखल झाले आहेत. मॅथ्यू हेडनची मुलगी ग्रेसी हेडनही आयपीएलचा भाग आहे.

व्यवसायाने टीव्ही प्रेझेंटर असलेली ग्रेसी तिच्या मोकळ्या वेळेत चेन्नईत स्थानिक लोकांसोबत वेळ घालवत आहे. चेन्नईतही तिचे खूप चाहते आहेत.हेडनची मुलगीही चेन्नईत प्रसिद्ध आहे. तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

ग्रेसी 'सेव्हन्स हॉर्स रेसिंग'ची टीव्ही प्रेझेंटर आहे. तिला क्रिकेटमध्येही खूप रस आहे. चेन्नई सुपर किंग्ज तिच्या हृदयाच्या खूप जवळ आहे, कारण तिचे वडील या संघाकडून खेळले आहेत.

सध्या ती आयपीएलमध्ये व्यस्त आहे. ग्रेसीचे वडील मॅथ्यू हेडनही आयपीएलमध्ये कॉमेंट्री करत आहेत. बाप-लेकीची ही जोडी वर्चस्व गाजवत आहे. ग्रेसी तिच्या वडिलांसोबतही अनेकदा कॉमेंट्री करताना दिसली आहे.

ग्रेसीबद्दल सांगायचे तर तिला साहसी खेळाची आवड आहे आणि तिला प्राण्यांबद्दलही विशेष ओढ आहे.