Join us

कोहलीपेक्षा धोनी महान, विश्वविजेते कर्णधार कपिल देव यांचा षटकार

नवी दिल्ली : सध्याच्या घडीला भारताचा कर्णधार विराट कोहली हा महान खेळाडू आहे, असा गवगवा त्याचे चाहते करत आहेत. ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2018 20:09 IST

Open in App

नवी दिल्ली : सध्याच्या घडीला भारताचा कर्णधार विराट कोहली हा महान खेळाडू आहे, असा गवगवा त्याचे चाहते करत आहेत. पण त्यांचे डोळे आता विश्वविजेते कर्णधार कपिल देव यांनी उघडले आहेत. कोहली हा भारताचा महान खेळाडू नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. हे सांगत असताना कपिल यांनी काही दाखलेही दिले आहेत.

विराट कोहलीने कर्णधार म्हणून काही विजय मिळवले आहेत. यामधील काही विजय ऐतिहासिक आहेत. पण तरीदेखील कोहली हा महान खेळाडू नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. कोहली हा महान नाही. तर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा महान क्रिकेटपटू आहे, असे कपिल यांनी म्हटले आहे.

याबाबत कपिल म्हणाले की, " धोनी हा भारताचा सर्वोत्तम खेळाडू आहे. कारण धोनीने भारताला 2007 साली ट्वेन्टी-20 विश्वचषक जिंकवून दिला. त्याचबरोबर 2011 साली त्याने भारताला विश्वचषक जिंकवून दिला. 90 कसोटी सामने खेळल्यावर धोनीने युवा खेळाडूंनी संधी मिळावी म्हणून निवृत्ती पत्करली. धोनीने नेहमीच देशाला पहिले प्राधान्य दिले आहे. त्यामुळे कोणत्याही क्रिकेटपटूपेक्षा धोनी हा सर्वोत्तम आहे."  

टॅग्स :विराट कोहलीमहेंद्रसिंह धोनीकपिल देव