धोनी-गंभीर एकत्र! रिषभ पंतच्या बहिणीच्या लग्नात जुळून आला योग, खास पोज देत काढला फोटो

MS Dhoni Gautam Gambhir together, Photo Viral: पंतच्या आमंत्रणाचा मान राखत दोघेही लग्न सोहळ्याला पोहचले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 13:51 IST2025-03-13T13:47:30+5:302025-03-13T13:51:51+5:30

whatsapp join usJoin us
MS Dhoni Gautam Gambhir spotted together at Rishabh pant Sister Wedding posing in same frame group photo viral on social media trending | धोनी-गंभीर एकत्र! रिषभ पंतच्या बहिणीच्या लग्नात जुळून आला योग, खास पोज देत काढला फोटो

धोनी-गंभीर एकत्र! रिषभ पंतच्या बहिणीच्या लग्नात जुळून आला योग, खास पोज देत काढला फोटो

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

MS Dhoni Gautam Gambhir together, Photo Viral: एमएस धोनी आणि गौतम गंभीर हे दोन भारतीय क्रिकेटमधील दिग्गज क्रिकेटपटू. एक जण दमदार सलामीवीर तर दुसरा मॅच फिनिशर. गंभीर निवृत्त झाला आणि त्यानंतर आता तो भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली भारताने नुकतीच चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. दुसरीकडे धोनी कोरोनाकाळात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, पण IPL मध्ये त्याचा जलवा अजूनही कायम आहे. मधल्या काळात गंभीरने धोनीबद्दल काही अशा गोष्टी बोलल्या होत्या, ज्यामुळे या दोघांत वितुष्ट आहे की काय अशा चर्चा रंगल्या होत्या. पण नुकतेच हे दोन जुने मित्र एकत्र येण्याचा योग जुळून आला. ऋषभ पंतच्या बहिणीच्या लग्नात ( Rishabh pant Sister Wedding ) दोघे एकमेकांना भेटले. पंतच्या आमंत्रणाचा मान राखत गंभीर लग्न सोहळ्याला उपस्थित राहिला. तिथेच त्याला त्याचा जुना मित्र महेंद्रसिंग धोनीही भेटला. या दोघांनी एकत्र पोज देऊन फोटोही काढला असून त्या फोटोची क्रिकेटविश्वात खास चर्चा आहे.

धोनी - गंभीर बऱ्याच वर्षांनी एकमेकांना भेटले...

२०११ च्या विश्वचषक विजयाचे हिरो असलेले धोनी आणि गंभीर यांची भेट पंतच्या बहिणीच्या लग्नाचे एक मोठे आकर्षण ठरली. धोनी आणि गंभीर एकाच फ्रेममध्ये फोटोसाठी दिसून आले. ही गोष्ट एक क्रिकेट चाहता म्हणून साऱ्यांनाच अतिशय मनोरंजक वाटली. धोनी आणि गंभीर दोघे ग्रुप फोटोसाठी एकत्र उभे राहिले. दोघांमध्ये कितपत गप्पा गोष्टी रंगल्या याची कल्पना या फोटोंमधून येत नाही. तसेच, पंतच्या कुटुंबीयांसोबत त्यांनी हा फोटो काढला असल्याने या दोघांमध्ये अंतरही बरेच होते. अशा परिस्थितीत या दोघांमध्ये संवाद रंगला की नाही याची कल्पना नाही. पण दोघेही बऱ्याच काळाने एकमेकांना अनौपचारिक कार्यक्रमात भेटले हे मात्र क्रिकेटचाहत्यांना सुखावणारे आहे.


दोघांनीही सारखेच कपडे घातले होते...

लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे दोघांनीही काहीसे सारख्याच धाटणीचे कपडे घातले होते. म्हणजेच जीन्स आणि टी-शर्ट असाच दोघांचाही पेहराव होता. एवढेच नाही तर त्यांच्या कपड्यांचा रंगही सारखाच होता. दोघांनीही काळ्या रंगाचाच टी-शर्ट घातलेला दिसला. गेल्या काही वर्षांमधील त्यांचे नाते पाहता, दोघांनी हे मुद्दामून जुळवून आणले असेल असे मुळीच वाटत नाही. त्यातही गंभीरच्या आधीच धोनी पंतच्या बहिणीच्या लग्नाला पोहोचला होता. त्यानंतर गंभीर आला. त्यामुळे हा निव्वळ योगायोग असल्याचेच बोलले जातेय.

दरम्यान, गेल्या वर्षीपर्यंत हे दोघे IPL मध्ये काही काळासाठी एकत्र दिसायचे. पण या वर्षी गंभीर टीम इंडियाचा कोच असल्याने IPL मध्ये सहभागी होऊ शकणार नाही. अशा परिस्थितीत IPL आधी झालेली धोनी-गंभीर भेट फारच चर्चेत आहे.

Web Title: MS Dhoni Gautam Gambhir spotted together at Rishabh pant Sister Wedding posing in same frame group photo viral on social media trending

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.