ठळक मुद्दे2019च्या वर्ल्ड कप स्पर्धेनंतर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहेइंडियन प्रीमिअर लीगमधील त्याच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष
भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. जुलै 2019 पासून धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नाही. कोरोना व्हायरसमुळे क्रिकेट स्पर्धा बंद आहेत आणि या कालावधीत सर्व खेळाडूंना आपापल्या कुटुंबीयांना पुरेसा वेळ द्यायला मिळत आहे. त्यानं काही दिवसांपूर्वी 8 लाख किंमतीचा ट्रॅक्टरही खरेदी केला. फार्म हाऊसवर त्याला सेंद्रीय शेती करायची आहे आणि त्यासाठी त्यानं हा ट्रॅक्टर खरेदी केल्याची चर्चा होती. शनिवारी धोनीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यात धोनी ट्रॅक्टरच्या मदतीनं जमीन कसताना दिसत आहे.
पीसीबीचा सावळागोंधळ; आधी पॉझिटिव्ह असलेल्या 10 पैकी 6 खेळाडूंचा कोरोना अहवाल निगेटिव्ह!
धोनीनं 90 कसोटी सामन्यांत 38.09 च्या सरासरीनं 6 शतकं व 33 अर्धशतकांसह 4876 धावा केल्या आहेत. 350 वन डे क्रिकेटमध्ये त्याची सरासरी ही 50.57 इतकी आहे. त्याच्या 10773 धावांत 10 शतकं व 73 अर्धशतकांचा समावेश आहे. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये त्यानं 98 सामन्यांत 1617 धावा केल्या आहेत. यष्टिरक्षणात कसोटीत त्याच्या नावावर 256 झेल व 38 स्टम्पिंग, वन डेत 321 झेल व 123 स्टम्पिंग आणि ट्वेंटी-20त 57 झेल व 34 स्टम्पिंग आहेत.
रांची येथे धोनीचा 7 एकरात फार्म हाऊस आहे. त्यात त्यानं आलिशान बंगल्यासह बाईक्स आणि कारसाठी गॅरेज बनवलं आहे. उर्वरित जागेवर त्याला सेंद्रिय शेती करायची आहे. त्यासाठी धोनीनं महिंद्रा स्वराज 963 एफई ट्रॅक्टर खरेदी केला. त्याच्या या निर्णयावर आनंद महिंद्रा म्हणतात,''
महेंद्रसिंग धोनीकडे योग्य निर्णय घेण्याची कला आहे, हे मला माहित होते.''
पाहा व्हिडीओ...
गतवर्षी धोनीनं भारतीय सैन्याची 20 वर्ष जूनी गाडी विकत घेतली होती. जोंगा या गाडीचं उत्पादन 1999मध्ये बंद झाले. जपानच्या निसान या कार कंपनीनं ही गाडी तयार केली होती. 1999मध्ये भारतीय सैन्यानं त्याची खरेदी करणं बंद केलं आणि त्याजागी दुसऱ्या गाडींना प्राधान्य दिलं. पण, जोंगाला कुणीच टक्कर देऊ शकलं नाही. 2018मध्येही धोनी चेन्नईत ट्रॅक्टरवर स्वार झालेला दिसला होता. त्यानं टीम इंडियाची बसही चालवली आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
हा माझा भारत नाही; 'त्या' घटनेनं आनंद महिंद्रा यांना केलं व्यथित!
अजिंक्य रहाणेकडून पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंचं कौतुक; म्हणाला...
1983 च्या वर्ल्ड कप विजेत्या संघाला मिळायचे इतके मानधन; Viral Photo पाहून विश्वास बसणार नाही
Video Viral : शोएब मलिक पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत करत होता फ्लर्ट; सानिया मिर्झा म्हणाली...
प्यार वाली Love Story: रॉबिन उथप्पाला दोन वेळा करावं लागलं होतं लग्न!
भारतीय क्रिकेटमध्ये नेपोटिझम?; अर्जुन तेंडुलकरला टीम इंडियात मिळेल का सहज संधी?, आकाश चोप्रा म्हणतो...