CSK Cricketer announces good news: महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) हा भारतीय संघाचा एक यशस्वी कर्णधार होता. कोरोनाकाळात त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. पण IPL मध्ये महेंद्रसिंग धोनी अजूनही सक्रीय आहे. गेली पाच वर्षे धोनी फक्त IPL दरम्यानच क्रिकेटच्या मैदानावर दिसतो. ते वगळता तो आपल्या वैयक्तिक आयुष्यात व्यग्र असतो. धोनीने आजवर अनेक खेळाडू घडवले. धोनीच्या तालमीत तयार झालेले क्रिकेटपटू टीम इंडियाकडूनही खेळले. अशाच एक स्टार क्रिकेटरने त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील गुड न्यूज दिली आहे. तुषार देशपांडे (Tushar Deshapnde) आणि त्याची पत्नी यांनी फोटो पोस्ट करत ही गोड बातमी दिली आहे.
भारतीय क्रिकेटपटू तुषार देशपांडे आणि त्यांची पत्नी नाभा गड्डमवार यांनी आपल्या चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून नाभा गरोदर असल्याची माहिती दिली आहे. तुषार देशपांडेने २९ डिसेंबर २०२५ रोजी एक इंस्टाग्राम पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये त्याने त्याच्या पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि लवकरच आमच्या घरात नवा पाहुणा येणार असल्याची घोषणा केली. कॉलेजमध्ये या दोघांमध्ये प्रेम जुळले. या जोडप्याने जून २०२३ मध्ये आधी साखरपुडा केला आणि नंतर काही काळातच लग्न केले. नाभा गड्डमवार ही एक चित्रकार आहे. तुषार आणि नाभा यांनी ही गोड बातमी शेअर केली आहे.
तुषार देशपांडेला २०२०मध्ये प्रथम दिल्ली कॅपिटल्सने विकत घेतले. पण त्याला फारशी चमक दाखवता आली नाही. २०२२ मध्ये तो चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळला आणि तेव्हा धोनीने त्याला मार्गदर्शन केल्यावर तो चमकला. त्याने २०२३च्या हंगामात १६ सामन्यात तब्बल २१ गडी घेतले. त्यानंतर २०२४ मध्येही १३ सामन्यात १७ बळी घेतले. याच कामगिरीमुळे त्याला टीम इंडियातही संधी मिळाली. सध्या तुषार देशपांडे राजस्थान रॉयल्सच्या संघातून खेळत आहे.