Join us
Daily Top 2Weekly Top 5

पंतच्या बहिणीच्या साखरपुड्यात धोनीचं भन्नाट भाषण; उपस्थितांमध्ये पिकला हशा, VIDEO

भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून महेंद्रसिंग धोनीला ओळखले जाते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2024 18:34 IST

Open in App

भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून महेंद्रसिंग धोनीला ओळखले जाते. धोनीच्या नेतृत्वात भारताने सर्वाधिक तीनवेळा आयसीसीचा किताब जिंकला आहे. धोनी सोशल मीडियापासून दूर असला तरी प्रसिद्धीपासून नाही. नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणावरून तो चर्चेत येत असतो. आता धोनी रिषभ पंतच्या बहिणीच्या साखरपुड्यामुळे चर्चेत आला आहे. अलीकडेच रिषभ पंतची बहीण साक्षी पंतचा साखरपुडा पार पाडला. या कार्यक्रमात धोनीने जोडप्याला शुभेच्छा देताना भन्नाट भाषण केले. 

साक्षी पंत आणि अंकित चौधरी यांना शुभेच्छा देताना धोनीने म्हटले, "ते खूप आनंदी दिसत आहेत... उत्साही देखील आहेत. त्यांनी चांगला डान्स केला मला आवडला. त्यांची जोडी चांगली जमली आहे. मी त्यांना पुढील आव्हानात्मक काळासाठी खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छितो. अर्थात करिअरच्या दृष्टीकोनातून बोलत आहे." धोनीने आव्हानात्मक शब्द उच्चारताच एकच हशा पिकला. 

दरम्यान, रिषभ पंतची बहीण साक्षी पंत लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. साक्षीचा साखरपुडा झाला असून त्याची झलक रिषभ आणि खुद्द साक्षीने सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली आहे. पंतची बहीण साक्षीने तिचा भावी पती अंकित चौधरीसोबत साखरपुड्यातील काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती तिची एंगेजमेंट रिंग दाखवताना दिसते. रिषभ पंतच्या कुटुंबात आता एका नव्या सदस्याचा समावेश झाला आहे. रिषभ पंतच्या दाजीचे नाव अंकित चौधरी आहे. अंकित चौधरी आणि साक्षी पंत जवळपास ९ वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते.

कोण आहे अंकित चौधरी? बराच काळ डेट केल्यानंतर दोघांनीही सातफेरे घेण्याचा निर्णय घेतला. अंकित चौधरी इंग्लंडमध्ये वास्तव्यास असतो. तो एलिट आयटीयू नावाच्या कंपनीच्या संचालक मंडळावर आहे. ही कंपनी शिक्षण आणि पर्यावरणासाठी दीर्घकाळ काम करत आहे. २०२१ मध्ये अंकित चौधरी या कंपनीत संचालक मंडळ म्हणून रुजू झाला.

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीरिषभ पंतभारतीय क्रिकेट संघऑफ द फिल्ड