Join us

MS Dhoni Birthday: कॅप्टन कूल धोनीने इंग्लंडमध्ये साजरा केला वाढदिवस; Rishabh Pantने पण लावली हजेरी

भारताला दोन विश्वचषक जिंकून देणारा धोनी आज ४१ वर्षांचा झाला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2022 09:37 IST

Open in App

MS Dhoni Birthday: भारतीय संघाला दोन वेळा आपल्या नेतृत्वाखाली विश्वचषक जिंकून देणारा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी गुरुवारी (७ जुलै) ४१ वर्षांचा झाला. त्याचा हा वाढदिवस इंग्लंडमध्ये खास पद्धतीने साजरा करण्यात आला. धोनीने आनंदाने केक कापत आप्तेष्टांच्या साथीने वाढदिवस साजरा केला. यावेळी धोनीचा मैदानावरील वारसदार रिषभ पंत देखील सेलिब्रेशनसाठी होता. धोनी आणि साक्षीच्या लग्नाचा वाढदिवस ४ जुलैला होता. दोघांच्या लग्नाला १२ वर्षे झाली. अशा परिस्थितीत हे जोडपे सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी इंग्लंडला पोहोचले. इथे दोघांनी लग्नाचा वाढदिवसही साजरा केला आणि आता धोनीचा वाढदिवसही साजरा केला.

साक्षीने स्वतः शेअर केला व्हिडिओ-

धोनीच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ आणि फोटो साक्षीने स्वतः इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. साक्षीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये धोनीने चमकदार असं सोनेरी जॅकेट घातलेलं दिसतंय. सर्वत्र छान लायटिंग केलं आहे. धोनीसाठी एक अप्रतिम केक तयार करण्यात आल्याचेही दिसत आहे. व्हिडीओमध्ये धोनी मेणबत्ती विझवून दोन्ही हातांनी केक कापताना दिसतो. या व्हिडिओला मागे इंग्लिश संगीतही लावण्यात आले आहे. साक्षीने हा व्हिडीओ शेअर केला आहे. बॅकग्राउंडमध्ये इंग्रजी संगीतही वाजत आहे.

साक्षीने शेअर केलेल्या फोटोमध्ये टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत देखील दिसला. पंत सध्या टीम इंडियासोबत इंग्लंड दौऱ्यावर आहे. तिथे एक कसोटी सामना खेळण्यात आला. त्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर आजपासून तीन टी-20 आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीरिषभ पंतभारत विरुद्ध इंग्लंडभारतीय क्रिकेट संघ
Open in App