Join us

मदर्स डे : भारतीय खेळाडूंनी सोशल मीडियावर आईसोबतचे छायाचित्र केले पोस्ट

आईच माझा गुरू... तोच माझा कल्पतरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2020 04:20 IST

Open in App

कोहलीने टिष्ट्वटरवर आपल्या आईसह फोटो शेअर करताना ‘हॅपी मदर्स डे’असे लिहिले. महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने आपल्या आईचे छायाचित्र शेअर केले आहे. त्यात तो लहानपणी आपल्या आईच्या कुशीत आहे. त्याने टिष्ट्वट केले,‘तू माझी आई आहेस. कुठल्याही बाबीपेक्षा तू नेहमी वेगळी आहेस. तुझे स्थान कुणीच घेऊ शकत नाही. तू माझ्यासाठी जे काही केलेस त्यासाठी आभार. हॅपी ‘मदर्स डे’ आई.विश्व चॅम्पियन व आॅलिम्पिक पदक विजेता महिला बॉक्सर व राज्यसभा सदस्य एम.सी. मेरीकोमने टिष्ट्वट केले,‘आईच्या प्रेमापेक्षा शक्तिशाली काहीच नाही.भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग, वीरेंद्र सेहवाग यांनीही आईबाबत प्रेम व्यक्त केले.टेनिसस्टार सानिया मिर्झा, रोहित शर्मा, आॅलिम्पिक रौप्यपदक विजेती व विश्व चॅम्पियन बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू, आॅलिम्पिक कांस्यपदक विजेती सायना नेहवाल यांनीही सोशल मीडियावर आईसोबतचे छायाचित्र पोस्ट करताना मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (वृत्तसंस्था)नवी दिल्ली : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीसह क्रीडा जगतातील सर्व स्टार खेळाडूंनी रविवारी ‘मदर्स डे’निमित्त सोशल मीडियावर आपल्या आईचे छायाचित्र व व्हिडीओ पोस्ट करीत आभार व्यक्त केले. सर्वांनी आपल्या आईप्रति प्रेमभाव व आदर व्यक्त करताना आपल्या जीवनात आईचे महत्त्व विषद करताना आईच्या दीर्घायुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करीत आभार मानले.

टॅग्स :मदर्स डेभारतीय क्रिकेट संघ