Join us

आईने आम्हाला सोडलं, तरी शामी आमच्यावर वडिलांसारखं प्रेम करतो

हसीन आणि तिचा पहिला पती एस.के. सैफुद्दिन यांची मोठी मुलगी खुशबू हिने या प्रकरणात आपले मत व्यक्त केले आहे. हसीनपेक्षा शामी हा एक व्यक्ती म्हणून चांगला आहे, असे खुशबूचे म्हणणे आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2018 13:05 IST

Open in App
ठळक मुद्देहसीनची पहिली मुलगी खुशबूचा खुलासा

कोलकाता : मोहम्मद शामी आणि त्याची पत्नी हसीन जहाँ यांच्या प्रकरणाला आता पुन्हा एकदा नवीन वळण मिळाले आहे. हसीन आणि तिचा पहिला पती एस.के. सैफुद्दिन यांची मोठी मुलगी खुशबू हिने या प्रकरणात आपले मत व्यक्त केले आहे. हसीनपेक्षा शामी हा एक व्यक्ती म्हणून चांगला आहे, असे खुशबूचे म्हणणे आहे.

हसीनबद्दल खुशबू म्हणाली की, " आमची आई, हसीन ही फार हुशार आहे. तिला आपल्या पायावर उभे राहायचे होते. तिला आपले स्वतंत्र असे स्थान निर्माण करायचे होते. मॉडेलिंगबरोबर तिला बॉलीवूडमध्येही चमकायचे होते. त्यामुळेच तिचे माझ्या बाबांशी पटले नाही. त्यामुळे हसीनने आम्हाला सोडले."

खुशबू पुढे म्हणाली की, " हसीनने आम्हाला सोडल्यावर तिने शामी यांच्याबरोबर दुसरे लग्न केले. खरंतर शामी आणि आमचा काहीच संबंध नाही. पण शामी हे एक माणूस म्हणून चांगले आहे. त्यांनी आम्हाला कधीच अंतर दिले नाही. त्यांनी आमच्यावर नेहमीच वडिलांसारखे आमच्यावर प्रेम केले. ते प्रत्येक सणांच्यावेळी आम्हाला भेटायचे, फिरायला घेऊन जायचे, भेटवस्तू द्यायचे."

खुशबूने हसीन आणि शामी यांच्या वादविवादाबद्दल खुशबू म्हणाली की, " हसीन आणि शामी यांच्यामध्ये चांगले नाते होते. त्यांचे एकमेकांवर प्रेमही होते. पण जेव्हा कुणी त्यांच्या दोघांमध्ये यायचे, ते हसीनला कधीच आवडत नव्हते. पण आता हे जे काही घडत आहे ते सारे अनाकलनीय असच आहे. "

टॅग्स :मोहम्मद शामीबॉलिवूड