Join us

रवी शास्त्रींना सकाळी शुद्धच नसते; गांगुलीचे खळबळजनक विधान

शास्त्री यांच्याशी सकाळी बोलू नये. कारण ते रात्रभर मद्यमान करत असतात. त्यामुळे सकाळी ते शुद्धीत नसतात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2018 17:42 IST

Open in App
ठळक मुद्देसकाळी शुद्धीत नसताना ते काहीही बरळत असतात.

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना कसाळी शुद्धच नसते, असे खळबळजनक विधान भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने केले आहे.

एका मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये काही दिवसांपूर्वी रवी शास्त्री आले होते. त्यावेळी त्यांनी गांगुलीचा एक किस्सा सांगितला होता. शास्त्री म्हणाले होते की, " भारतीय संघ 2007 साली बांगलादेशच्या दौऱ्यावर होता. यावेळी आम्ही सकाळी बसमधून प्रवास करणार होतो. संघातील सर्व खेळाडू आले होते, पण गांगुली काही दिसला नाही. आम्ही बराच वेळ गांगुलीची वाट पाहिली. पण संघात शिस्त असायला हवी, त्यामुळे मी गांगुलीविना बस सोडायला सांगितली. "

त्यानंतर गांगुलीही या कार्यक्रमात आला होता. त्यावेळी गांगुलीला हा किस्सा सांगण्यात आला. त्यावेळी गांगुली म्हणाला की, " या दौऱ्यात असा कोणताच प्रकार घडला नव्हता. शास्त्री यांच्याशी सकाळी बोलू नये. कारण ते रात्रभर मद्यमान करत असतात. त्यामुळे सकाळी ते शुद्धीत नसतात. तुम्हीदेखील त्यांची मुलाखत सकाळी घ्यायला नको होती. कारण सकाळी शुद्धीत नसताना ते काहीही बरळत असतात. त्यामुळे तुम्ही त्यांची मुलाखत संध्याकाळी घ्यायला हवी होती. "

टॅग्स :रवी शास्त्रीसौरभ गांगुलीक्रिकेट