Join us  

Monty Panesar : 'ये तो बिल्कुल नही बदला यार'; सचिन अन् युवराजची विकेट घेतल्यानंतर चर्चेत आला माँटी पानेसर

Monty Panesar, Road Safety World Series माँटी पानेसरन ४ षटकांत १५ धावांत ३ विकेट्स घेतल्या.  

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 10:26 AM

Open in App

इंग्लंडचा माजी फिरकीपटू माँटी पानेसर ( Former England spinner Monty Panesar) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजच्या ( Road Safety World Series) इंग्लंड लिजंड्स ( England Legends ) विरुद्ध इंडिया लिजंड्स ( India Legends ) यांच्यातील सामन्यात पानेसरनं ज्या चतुराईनं महान फलंदाज सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar) आणि युवराज सिंग ( Yurvaj Singh) यांना बाद केले, त्यानंतर सोशल मीडियावर त्याचीच हवा झाली. केव्हीन पीटरसनच्या वादळी खेळीला इरफान पठाणचे सडेतोड उत्तर, मनप्रीत गोनीच्या फटकेबाजीनं इंग्लंडचे गोलंदाज निरूत्तर

३८ वर्षीय गोलंदाजाच्या खेळात काहीच बदल झालेला पाहायला मिळाला नाही. चेंडूचा तोच टप्पा, तेवढेच वळण अन् तगड्या फलंदाजांना देणारा चकवा, यामुळे पानेसर पुन्हा चर्चेत आला आहे. पानेसरनं इंग्लंडला सचिन तेंडुलकर, मोहम्मद कैफ व युवराज सिंग या महत्त्वाच्या विकेट्स मिळवून दिल्या. मंगळवारी झालेल्या सामन्यात पानेसरनं नव्या चेंडूसह पहिले षटक फेकले आणि फक्त ७ धावा दिल्या. त्यानंतर दुसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर मोहम्मद कैफचा ( १) त्रिफळा उडवला. त्यानंतर त्याच षटकाच्या अखेरच्या चेंडूवर तेंडुलकरला माघारी जाण्यास भाग पाडले. पानेसरच्या गोलंदाजीवर पुढे येऊन फटका मारण्याचा प्रयत्न फसला अन् तेंडुलकरला ( ९) यष्टिचीत होऊन माघारी जावे लागले. पानेसरनं त्यानंतर ९व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर युवराजला बाद केलं. पानेसरन ४ षटकांत १५ धावांत ३ विकेट्स घेतल्या.  महेंद्रसिंग धोनीनं सुरू केला IPL 2021साठी सराव, नेट्समध्ये हॅलिकॉप्टर शॉट्सची फटकेबाजी

इंग्लंडच्या सध्याच्या संघातील फिरकीपटू जॅक लिच यापेक्षा पानेसर बरा अशी चर्चा सुरू झाली आहे. २०१२च्या मालिकेत पानेसरनं भारताविरुद्ध तीन सामन्यांत १७ विकेट्स घेतल्या होत्या आणि इंग्लंडनं २-१ अशी मालिका जिंकली होती. पानेसरनं कसोटी पदापर्णात पहिली विकेट ही तेंडुलकरचीच घेतली होती. पानेसरच्या गोलंदाजीवर तेंडुलकर सहा वेळा बाद झाला आहे.  

टॅग्स :सचिन तेंडुलकरयुवराज सिंगइंग्लंडभारत