Join us

मोहम्मद शेहझादने केला धोनीसारखा रनआऊट, व्हिडीओ झाला वायरल

त्याची ही रन आऊट करण्याची पद्धत धोनीसारखीच होती.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2019 18:37 IST

Open in App

नवी दिल्ली : क्रिकेट जगतामध्ये महेंद्रसिंग धोनीचे एक अढळ स्थान आहे. एक कर्णधार म्हणून त्याने भारताला दोन विश्वचषक जिंकवून दिले आहेत. एक फलंदाज आणि मॅच फिनिशर म्हणूनही क्रिकेट विश्वात धोनीची ख्याती आहे. त्याचबरोबर एक यष्टीरक्षक म्हणूनही धोनीचा लौकिक आहे. धोनीला आदर्श मानणारे खेळाडूही बरेच आहेत. अफगाणिस्तानचा यष्टीरक्षक मोहम्मद शेहझादही धोनीचा चाहता. शेहझादने एका सामन्यात चक्क धोनीच्या स्टाइलमध्ये रन आऊट केले आणि त्याचा व्हिडीओ वायरल झाल्याचे पाहायला मिळाले.

बांगलादेश प्रीमिअर लीगमध्ये चितगांव विकिंग्स आणि ढाका डायनामाइट्स यांच्यामध्ये हा सामना खेळला गेला. या सामन्यात शेहझादने मोठ्या शिताफीने मिजानुर रहमानला रन आऊट केले. त्याची ही रन आऊट करण्याची पद्धत धोनीसारखीच होती. त्यामुळे आता हा व्हिडीओ चांगलाच वायरल होत आहे.

हा पाहा खास व्हीडीओ

टॅग्स :महेंद्रसिंह धोनीअफगाणिस्तान