Join us
Daily Top 2Weekly Top 5

मोहम्मद शमीच्या पत्नीचा Bold अंदाज; नेटिझन्स म्हणाले...

भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँ सध्या चांगलीच चर्चेत आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2020 11:53 IST

Open in App

भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँ सध्या चांगलीच चर्चेत आहे. इंस्टाग्रामवर शमीची पत्नी टिक टॉक व्हिडीओ पोस्ट करताना दिसत आहेत.  या व्हिडीओवर नेटिझन्स तिच्यावर टीका करताना पाहायला मिळत आहेत. हसीन जहाँच्या इंस्टाग्रामवरील व्हिडीओवर अनेकांनी टीका केली. हसीन जहाँला ट्रोल केले गेले. त्यावर तिनंही सडेतोड उत्तर दिले, परंतु तिनं सर्व मर्यादा ओलांडल्या. तिनं बिकनीवरील फोटोशूटचा व्हिडीओ पोस्ट करून ट्रोलर्सवर खालच्या थराची टीका केली.  पण, तिनं शनिवारी एक  हॉट फोटो शेअर केला.  

मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ एकत्र राहत नाही. हसीन जहाँनं भारतीय गोलंदाजावर बरेच गंभीर आरोप केले. त्याचे विवाहबाह्य संबंध असल्याचे आरोप तिनं केले, शिवाय शमीचे कुटुंबीय छळ करत असल्याचा दावाही करत तिनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. शमीनं फिक्सिंगही केल्याचा आरोप तिनं केला होता आणि त्यानुसार भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) चौकशी करून शमीला क्लिन चिट दिली. पण, हा वाद सध्या न्यायालयात गेला आहे.    

टॅग्स :मोहम्मद शामीसोशल मीडिया