Join us  

हसीन जहाँला वाटतेय भीती; मोहम्मद शमीच्या पत्नीनं सर्वोच्च न्यायालयाकडे मागितली पोलीस सुरक्षा

5 ऑगस्टला अयोध्येत राम मंदिर भूमिपूजनानंतर हसीन जहाँनं देशातील हिंदूंचे अभिनंदन करणारी पोस्ट लिहिली होती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 7:56 PM

Open in App

भारतीय संघाचा गोलंदाज मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँ हिला जीवे मारण्याची व बलात्कार करण्याच्या धमक्या सोशल मीडियावरून दिल्या जात आहे. 5 ऑगस्टला अयोध्येत राम मंदिर भूमिपूजनानंतर हसीन जहाँनं देशातील हिंदूंचे अभिनंदन करणारी पोस्ट लिहिली होती. त्यानंतर तिला कट्टरवाद्यांकडून जीवे मारण्याच्या व बलात्कार करणाऱ्या धमक्या येऊ लागल्या. त्यामुळे तिनं कोलकाता उच्च न्यायलयात तिला व मुलगीला सुरक्षा देण्यात यावी अशी याचिका दाखल केली आहे. 

CPL 2020 चं जेतेपद अन् ट्वेंटी-20त भीमपराक्रम करून 'तो' दुबईत आला; CSKकडून 'चॅम्पियन'चं स्वागत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही केली होती विनंतीहसीन जहाँ सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. तिला सातत्यानं ट्रोल केलं जातं. राम मंदिर भूमिपूजनानंतर हे प्रकार वाढल्याचं तिनं सांगितलं. तिनं याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेही मदत मागितली होती. हसीन जहाँ पश्चिम बंगालमध्ये तिच्या भावाकडे राहत आहे. तिनं एका टिव्ही चॅनलला सांगितले की. पश्चिम बंगालचे प्रशासन खुप चांगले आहे. उत्तर प्रदेशमध्ये राहत असते, तर आतापर्यंत माझ्यासोबत काहीतरी वाईट झाले असते. अनेक प्रसंग घडले असते. मी आता ज्यांच्याकडे राहतेय, ते माझी काळजी घेत आहेत.''    जाणून घेऊया नेमकं काय प्रकरण!5 ऑगस्टला हसीन जहाँनं एक पोस्ट केली होती. त्यात तिनं राम मंदिर भूमिपूजनावर एक पोस्ट लिहिली. हसीन जहाँने पोस्ट केली की,''अयोध्यामध्ये श्रीराम मंदिर भूमिपूजनासाठी समस्त हिंदू समाजाचे अभिनंदन. सर्वांना खूप खूप शुभेच्छा...'' शुभेच्छा देताना तिनं अनेक इमोजी वापरल्या आणि त्या काहींना पसंत आल्या नाही. त्यांनी तिला जीवे मारण्याची धमकी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी अन् गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मदतनेटिझन्सच्या या पवित्र्यावर हसीन जहाँनं नाराजी व्यक्त केली. तिनं आणखी एक पोस्ट लिहिली की,''5 ऑगस्टला जेव्हा अयोध्येत श्रीराम मंदिर भूमिपूजन झाले तेव्हा मी देशातील हिंदू समाजाला शुभेच्छा दिल्या. हिंदू समाजही मुस्लीमांच्या सणांना शुभेच्छा देतात. परंतु, काही कट्टरवाद्यांना माझ्या या शुभेच्छा आवडल्या नाही आणि त्यांनी माला सोशल मीडियावर शिव्या दिल्या. जीवे मारण्याच्या आणि बलात्कार करण्याच्या धमक्या दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना विनंती करते की, प्रशासनानं याची गंभीर दखल घ्यावी आणि चौकशीचे आदेश द्यावे. मी सर्वधर्म समभाव जपणाऱ्या देशाची नागरिक आहे आणि अशा घटना घडणे दुर्भाग्याचे आहे.    

अन्य महत्त्वाच्या बातम्या

IPL 2020मध्ये 'Purple Cap'च्या शर्यतीत पाच दावेदार; कोण मारेल बाजी? 

IPL 2020च्या पहिल्या सामन्यापेक्षाही चर्चा रंगलीय 'या' सुंदरीची; पाहा फोटो

IPL 2020 : रोहित शर्मासह Mumbai Indiansच्या खेळाडूंची पुन्हा झाली कोरोना टेस्ट; पाहा व्हिडीओ

IPL 2020आधी विराट कोहलीनं स्वतःला लिहिलं भावनिक पत्र; हा Video तुम्हालाही इमोशनल करेल

आनंद पोटात मावेना... विराट कोहलीची IPL 2020 जेतेपदवाली Feeling; पाहा भन्नाट Video

IPL 2020 साठी KKRनं अमेरिकेहून गोलंदाज मागवला; 140kphच्या वेगानं करतो मारा, Video

भीषण अपघातात क्रिकेटपटू गंभीर जखमी; दोन्ही हात व पायांवर करावी लागेल शस्त्रक्रिया?

 

टॅग्स :मोहम्मद शामीउच्च न्यायालय