Mohammad Shami relatives fraud case: टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी विविध कारणांमुळे चर्चेत असतो. भारतासाठी काही काळ खेळल्यानंतर त्याच्या पत्नीने त्याच्यावर आरोप लावले. त्यांच्या घटस्फोटानंतर शमीने दमदार पुनरागमन केले. सध्या तो IPL 2025 खेळतोय. पण, दुसरीकडे, त्याची बहीण आणि मेहुणे एका फसवणुकीच्या गुन्ह्यात अडकले आहेत. दोघांचीही नावे फसवणुकीच्या प्रकरणात घेतली जात आहेत. बहीण आणि मेहुण्याव्यतिरिक्त, शमीच्या काही इतर नातेवाईकांसह एकूण १८ जण या फसवणुकीच्या प्रकरणात सामील असल्याचे आढळून आले आहे. नेमके काय आहे हे प्रकरण, जाणून घेऊया.
बुधवारी २ एप्रिलला जिल्हा डीएम निधी गुप्ता वत्स यांनी सांगितले की, प्राथमिक तपासात या सर्वांवर मनरेगा अंतर्गत बेकायदेशीरपणे पैसे घेतल्याचा आरोप आहे. मनरेगातील पैशांच्या वाटपात घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. यामध्ये दोषी आढळलेल्या कामगारांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासोबतच त्याच्याविरुद्ध पंचायत राज कायद्याअंतर्गत पोलिसात तक्रारही दाखल करण्यात आली आहे.
- शमीची बहीण, मेहुण्यांसह १८ जणांचा समावेश
जिल्हाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, स्थानिक अधिकाऱ्यांनी केलेल्या या प्रकरणाच्या चौकशीत एकूण १८ लोकांची नावे उघड झाली आहेत. हे १८ लोक कोणतेही काम न करता मनरेगा भत्त्याचे पैसे घेत असल्याचे उघड झाले आहे. त्या १८ जणांमध्ये मोहम्मद शमीची मोठी बहीण शबीना, तिचा नवरा गजनवी, शबीनाचे तीन मेहुणे आमिर सुहेल, नसीरुद्दीन आणि शेखू यांचा समावेश होता. जिल्हाधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, त्यात गावप्रमुख गुले आयेशा यांच्या मुली आणि मुलांची नावेदेखील समाविष्ट आहेत.
- गेल्या ३ वर्षांपासून कोणतेही काम न करता घेताहेत पैसे
गावप्रमुख गुले आयेशा ही महिला मोहम्मद शमीच्या बहिणीची सासूदेखील आहे. ही महिला या संपूर्ण घोटाळ्याची सूत्रधार असल्याचे म्हटले जात आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ज्या १८ जणांची नावे खोटी असल्याचे आढळून आले, त्यांचे मनरेगा जॉब कार्ड जानेवारी २०२१ मध्ये तयार करण्यात आले होते. ऑगस्ट २०२४-२५ पर्यंत त्यांच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यात आले आहेत. पण या लोकांनी एकही दिवस काम केलेले नाही.
- खाते सील करून पैसेवसुलीचे आदेश
जिल्हाधिकाऱ्यांनी गावप्रमुखाचे खाते सील करून पैसे वसूल करण्याचे निर्देश दिले आहेत. मनरेगामधील अनियमिततेबाबत अनेक माध्यमांमध्ये वृत्त आले होते, त्यानंतर चौकशी करण्यात आली. गावप्रमुखांव्यतिरिक्त, ग्रामविकास अधिकारी आणि सहाय्यक कार्यक्रम अधिकारी यांचीदेखील चौकशी सुरू आहे.
Web Title: Mohammed Shami sister and her mother in law are centre of MNREGA scandal other relatives involved in fraud total 18 culprits
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.