Join us

मोहम्मद शमीला नाव ठेवणाऱ्यांची होईल 'बोलती बंद'; खास VIDEO होतोय व्हायरल, तुम्ही पाहिलात?

Mohammad Shami Viral Video: सध्या एक असा व्हिडीओ व्हायरल झालाय, ज्यामुळे शमीवर टीका करणारे गप्प बसतील.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 17:49 IST

Open in App

Mohammad Shami Viral Video: भारतीय संघाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी सध्या विविध मुद्द्यांमुळे चर्चेत आहे. भारताने नुकतेच चॅम्पियन्स ट्रॉफी ( Champions Trophy 2025 ) विजेतेपद जिंकले. या स्पर्धेत जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर झाला होता. अशा परिस्थितीत मोहम्मद शमीने आपल्या अनुभवाच्या जोरावर भारतीय संघाला बुमराहची उणीव भासू दिली नाही. त्याने सर्व सामन्यात अप्रतिम कामगिरी करत आपली उपयुक्तता सिद्ध केली. पण तरीही त्याच्यावर काही लोकांनी टीका केली. शमीने रोजा ठेवला नाही, म्हणून त्याच्यावर ठराविक समुहातील मंडळींनी टीका केली. पण सध्या एक असा व्हिडीओ व्हायरल झालाय, त्यामुळे शमीवर टीका करणाऱ्यांची बोलती बंद होईल.

कोणता आहे हा व्हिडीओ?

भारतीय संघाने रविवारी दिमाखात चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. या सामन्यानंतर सर्व खेळाडूंना मेडल देऊन सन्मान करण्यात आला. अखेरीस संघाला विजयाची ट्रॉफी देण्यात आली. त्या ट्रॉफीसोबत शॅम्पेनची बॉटलदेखील देण्यात आली. सहसा विजयाच्या सेलिब्रेशनच्या वेळी शॅम्पेन उडवून सर्व खेळाडू जल्लोष साजरा करतात. पण शॅम्पेन हे एकप्रकारच्या मद्याचा प्रकार आहे आणि इस्लाममध्ये हे निषिद्ध मानले जाते. त्यामुळे शॅम्पेन उडवत असल्यावर ती आपल्या अंगावर उडू नये, म्हणून शमी सेलिब्रेशनमधून बाजूला गेला. त्यानंतर अनेकांनी शमीबाबत सकारात्मक कमेंट केल्या आहेत. जी व्यक्ती धर्माचे पालन करण्यासाठी सेलिब्रेशनपासून अलिप्त राहते, त्या व्यक्तीवर टीका करणे योग्य नाही, असे युजर्सची भावना असल्याचे दिसले.

दरम्यान, भारताने सामना जिंकला असला तरीही न्यूझीलंडच्या गोलंदाजांची चांगली झुंज दिली. भारतीय डावाच्या सुरुवातीला रोहित शर्माने तडाखेबाज फलंदाजीने प्रारंभ केला होता. रोहित ज्या वेगाने खेळत होता त्यावेगाने भारत ३०-३५ षटकात सामना जिंकू शकला असता. पण शुबमन गिल आणि विराट कोहली झटपट बाद झाल्याने तो डाव काहीसा फसला. पण न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी करत भारताला विजयासाठी शेवटपर्यंत झुंजवले. अखेर ४९व्या षटकात भारताला विजय मिळवला आला.

टॅग्स :चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५मोहम्मद शामीव्हायरल व्हिडिओभारतीय क्रिकेट संघ