National Sports Awards (Marathi News) : नवी दिल्लीत आज राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात आले. भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी ( Mohammed Shami) याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला गेला. शमीसह एकूण २६ खेळाडूंना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. बॅडमिंटनपटू चिराग शेट्टी व सात्विक साईराज रँकीरेड्डी यांना यंदाचा प्रतिष्ठीत खेलरत्न पुरस्कार देण्यात आला आहे. यासह नागपूरचा ओजस प्रवीण देवतळे व साताराची अदिती गोपीचंद स्वामी या तिरंदाजांचाही अर्जुन पुरस्काराने गौरव करण्यात आला.
ओजस व अदिती यांनी मागील वर्षभरात भारताला तिरंदाजीत अनेक ऐतिहासिक पदकं जिंकून दिली आहेत. विश्वविजेते अदिती आणि ओजस हे सातारा येथील प्रवीण सावंत यांच्या दृष्टी आर्चरी अकादमीत सराव करतात.
खेलरत्न पुरस्कार
चिराग शेट्टी - बॅडमिंटन
सात्विक साईराज रँकीरेड्डी - बॅडमिंटन
अर्जुन पुरस्कार
ओजस प्रवीण देवतळे - धनुर्विद्या
अदिती गोपीचंद स्वामी - धनुर्विद्या
श्रीशंकर - ऍथलेटिक्स
पारुल चौधरी - ऍथलेटिक्स
मोहम्मद हुसामुद्दीन - बॉक्सर
आर वैशाली - बुद्धिबळ
मोहम्मद शमी - क्रिकेट
अनुष अग्रवाल - घोडेस्वारी
दिव्यकृती सिंग - अश्वारूढ पोशाख
दीक्षा डागर - गोल्फ
कृष्ण बहादूर पाठक - हॉकी
सुशीला चानू - हॉकी
पवन कुमार - कबड्डी
रितू नेगी - कबड्डी
नसरीन - खो-खो
पिंकी - लॉन बॉल्स
ऐश्वर्या प्रताप सिंह तोमर - शूटिंग
ईशा सिंग - शूटिंग
हरिंदर पाल सिंग - स्क्वॉश
अहिका मुखर्जी - टेबल टेनिस
सुनील कुमार - कुस्ती
अंतिम - कुस्ती
रोशिबिना देवी - वुशू
शीतल देवी - पॅरा धनुर्विद्या
अजय कुमार - अंध क्रिकेट
प्राची यादव – पॅरा कॅनोइंग