Mohammed Shami Over Hat Trick During Ranji Trophy Match : भारतीय संघातील प्रमुख जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील वनडे मालिकेसाठी संघात स्थान मिळालेले नाही. संघ निवडीनंतर बीसीसीआयचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी शमीच्या फिटनेसमुळे तो संघाबाहेर असल्याचे वक्तव्य केले होते. यावर शमीनं आपल्या मनातील खंतही व्यक्त केली. जर मी अनफिट असेल तर रणजी करंडक स्पर्धेतील चार दिवसीय सान्यासाठी फिट कसा? असा प्रश्न उपस्थितीत करत भारतीय संघातून डावलल्याने निराश असल्याची गोष्ट बोलून दाखवली. त्यानंतर मैदानातील कामगिरीसह त्याने निवडकर्त्यांना कडक रिप्लाय दिला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
१४ व्या षटकापर्यंत शमी विकेटसाठी संघर्ष करताना दिसला
मोहम्मद शमी हा बंगालच्या संघाकडून रणजी सामन्यात खेळत आहे. कोलकाताच्या ईडन गार्डन्सच्या मैदानात उत्तराखंड विरुद्धच्या सामन्यात शणीनं एकाच षटकात चार विकेट्स घेत आपल्या गोलंदाजीतील धार दाखवून दिली. पहिल्या १४ षटकांच्या स्पेलमध्ये त्याला एकही विकेट मिळाली नव्हती. पण ३५ वर्षीय गोलंदाजाने शेवटी आपला अनुभव दाखवून देत विकेटचा डाव साधताना एकाच षटकात तिघांना तंबूचा रस्ता दाखवला.
थकलेले चेहरे, कंटाळवाणा मूड.. विराट-रोहितसह सारेच हैराण! ऑस्ट्रेलियात पोहचण्याआधी काय घडलं?
पहिली विकेट मिळाली अन् मग...
मोहम्मद शमीनं १५ व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर जनमजय जोशी याला अप्रतिम इनस्विंगवर चकवा देत क्लीन बोल्ड केले. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर राजन कुमारला त्याे विकेट किपर करवी झेलबाद केले. पहिल्या १४ षटकात विकेटसाठी संघर्ष करणारा शमी या षटकात हॅटट्रिकवर पोहचला. तो डाव काही साधता आला नाही, पण शेवटी त्याने पाचव्या षटकात तिसरी विकेट आपल्या खात्यात जमा करत ओव्हर हॅटट्रिकसह आपल्या गोलंदाजीतील धार दाखवली. त्याने पहिल्या डावात १४.५ षटके गोलदाजी करताना ३७ धावा खर्च करत ३ विकेट्स घेतल्या. या हिटशोसह त्याने फिटनेसवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत करणाऱ्या निवडकर्त्यांना कडक रिप्लायच दिल्याचे दिसते. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर त्याची निवड न करणे ही मोठी चूक ठरणार का? ते गिल अँण्ड कंपनीच्या वनडे मालिकेतील कामगिरीवर ठरेल, पण शमीसंदर्भात आगरकरांनी केलेले फिटनेस संदर्भातील वक्तव्य आणि तो रणजी स्पर्धेत उतरुन पुन्हा मैदान गाजवताना दिसलेले चित्र बीसीसीआय निवड समितीचा सावळा गोंधळ दाखवून देणारा आहे, असेच म्हणावे लागले.