Join us

डिव्हिलियर्सला बाद करुन मोहम्मद शामीने फोडली जोडी, दक्षिण आफ्रिकेकडे 150 पेक्षा जास्त धावांची आघाडी

भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये दुस-या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. डिव्हिलियर्स 80 धावांवर मोहम्मद शामीच्या गोलंदाजीवर बाद झाला, एल्गरने आपले अर्धशतक पूर्ण केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2018 14:41 IST

Open in App
ठळक मुद्देएल्गर आणि डिव्हिलियर्सची जोडी फोडण्यासाठी भारतीय गोलंदाजांना संघर्ष करावा लागत आहे. डिव्हिलियर्स आणि एल्गरने भारतीय गोलंदाजी समर्थपणे खेळून काढत दडपण दूर केले.

डरबन - भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये दुस-या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. डिव्हिलियर्स आणि डीन एल्गरने सुरुवातीला समर्थपणे भारतीय गोलंदाजीचा सामना करत धावफलक हलता ठेवला. पण डिव्हिलियर्स 80 धावांवर मोहम्मद शामीच्या गोलंदाजीवर बाद झाला.   एल्गरने आपले अर्धशतक पूर्ण केले आहे. तिस-या दिवशी पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबवावा लागला होता. 

त्यावेळी दक्षिण आफ्रिकेची दोन बाद 90 स्थिती होती. दक्षिण आफ्रिकेकडे आता 150 पेक्षा जास्त धावांची आघाडी आहे. एल्गर आणि डिव्हिलियर्सची जोडी फोडण्यासाठी भारतीय गोलंदाजांना संघर्ष करावा लागला. काल दुस-या डावाला सुरुवात झाल्यानंतर प्रारंभीच दक्षिण आफ्रिकेला दोन धक्के बसले त्यावेळी भारत दक्षिण आफ्रिकेवर वर्चस्व मिळवेल असे वाटत होते पण डिव्हिलियर्स आणि एल्गरने भारतीय गोलंदाजी समर्थपणे खेळून काढत दडपण दूर केले. दोघांमध्ये तिस-या विकेटसाठी 130 पेक्षा जास्त धावांची भागीदारी केली. 

पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेने उभारलेल्या ३३५ धावांचा पाठलाग करताना भारताचा पहिला डाव ३०७ धावांमध्ये संपुष्टात आला. कर्णधार कोहलीच्या (१५३) तडाखेबंद दीडशतकाच्या जोरावर भारतावरील मोठ्या आघाडीचे संकट टळले. तरी, यजमानांनी २८ धावांची नाममात्र आघाडी घेत वर्चस्व मिळवले. यानंतर दुसºया डावात फलंदाजीला उतरलेल्या आफ्रिकेची सुरुवात मात्र अडखळती झाली. जसप्रीत बुमराहने भेदक माºयाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेला सुरुवातीला दोन धक्के दिले.

बुमराहने नव्या चेंडूने शानदार मारा केला. सुपरस्पोर्ट पार्कच्या खेळपट्टीवर चेंडूला आतापासूनच कमी उसळी मिळत आहे. त्याने एडेन मार्कराम (१) व हाशिम अमला (१०) या दोघांना तीन षटकांच्या अंतरात तंबूचा मार्ग दाखवित दक्षिण आफ्रिकेची २ बाद ३ अशी अवस्था केली. रविचंद्रन अश्विनने गोलंदाजीची सुरुवात केली तर ईशांत शर्माने पहिला बदली गोलंदाज म्हणून जबाबदारी सांभाळली. मात्र, एबी आणि एल्गर यांनी तिस-या दिवशी ८७ धावांची नाबाद भागीदारी करत भारताला पुढील यशापासून वंचित ठेवले. 

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८एबी डिव्हिलियर्स