"यापुढची वाट नक्कीच कठीण असेल पण..."; मोहम्मद शमीने इन्स्टाग्रामवरून शेअर केला लेटेस्ट फोटो

शमीने या फोटोसोबत आपल्या दुखापतीच्या रिकव्हरीबाबतही अपडेट दिली आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2024 05:13 PM2024-04-08T17:13:40+5:302024-04-08T17:14:24+5:30

whatsapp join usJoin us
Mohammed Shami all set to comeback in Team India shares photo on social media gives latest update about injury recovery | "यापुढची वाट नक्कीच कठीण असेल पण..."; मोहम्मद शमीने इन्स्टाग्रामवरून शेअर केला लेटेस्ट फोटो

"यापुढची वाट नक्कीच कठीण असेल पण..."; मोहम्मद शमीने इन्स्टाग्रामवरून शेअर केला लेटेस्ट फोटो

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Mohammed Shami Injury Recovery Latest Update: भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून आपल्या तंदुरूस्तीबाबात एक महत्त्वाची अपडेट दिली आहे. शमीने एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो कुबड्यांच्या सहाय्याने उभा असल्याचे दिसत आहे. रिव्हर्स स्विंगचा बादशाह असलेला शमी गेल्या वर्षी नरेंद्र मोदी स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळल्या गेलेल्या वनडे वर्ल्ड कप फायनल 2023 मध्ये क्रिकेटच्या मैदानावर खेळताना दिसला होता. या सामन्यात भारताला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आणि तेव्हापासून शमी क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. IPL 2024 मध्येही तो दुखापतीमुळे खेळत नाहीये. परंतु आता लवकरच तो क्रिकेटच्या मैदानात परणार आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या T20I मालिकेत खेळू शकला नव्हता. यानंतर तो दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेलाही मुकला. शमी गेल्या T20 स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला होता. त्यासोबतच वन डे वर्ल्ड कपमध्येही त्याने सर्वाधिक बळी टिपले होते. पण सध्या तो दुखापतग्रस्त असून त्याच्या रिकव्हरीची त्यानेच अपडेट दिली आहे. त्याने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आणि लिहिले की तो हळूहळू पुनरागमनाच्या जवळ पोहोचत आहे आणि पुन्हा एकदा यशाला गवसणी घालण्यास सज्ज आहे. यापुढचा मार्ग कठीण असू शकतो पण तो प्रवास गरजेचा आहे कारण त्यातून मिळणारा निकाल सर्वोत्तम असेल.

दरम्यान, भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतीमुळे वर्ल्ड कप 2023 पासून मैदानापासून दूर आहे. विश्वचषकादरम्यानही त्याला अकिलीस टेंडनचा म्हणजेच पोटरीच्या दुखापतीचा त्रास होत होता. असे असूनही त्याने उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध ७ विकेट्स घेतल्या होत्या. २०२३च्या विश्वचषकानंतर त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली आणि आता शमी लवकरच पुनरागमन करेल अशी आशा आहे.

Web Title: Mohammed Shami all set to comeback in Team India shares photo on social media gives latest update about injury recovery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.