Mohammad Kaif Slams Rohit Sharma’s Removal As ODI Captain : ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड झाली आणि टीम इंडियाला आता वनडेतही नवा कर्णधार मिळाला. कसोटीतील निवृत्तीनंतर रोहितची जागा घेणाऱ्या शुबमन गिल ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रोहित संघात असताना वनडे संघाचे नेतृत्व करताना दिसेल. टीम इंडियातील ही खांदेपालट म्हणजे रोहितच्या नेतृत्वातील कर्तृत्वाकडे दुर्लक्ष करत शुबमन गिलला कॅप्टन्सीत ड्युटी लावल्याचा प्रकार आहे, असं माजी क्रिकेटरला वाटतं. ज्या रोहित शर्मानं भारतीय क्रिकेटसाठी १६ वर्षे दिली त्याला आपण एक वर्ष देऊ शकलो नाही. रोहित शर्माच्या कॅप्टन्सीतील कामगिरीची आकडेवारी दाखवत मौहम्मद कैफनं आगरकर अँण्ड कंपनीला (BCCI Selection Committee ) झापलं आहे. तो नेमकं काय म्हणाला जाणून घेऊयात सविस्तर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ज्यानं टीम इंडियाला १६ वर्ष दिली त्याला आपण आणखी एक वर्ष देऊ शकलो नाही
मोहम्मद कैफनं सोशल मीडियाच्या माध्यमातून एक खास व्हिडिओ शेअर केलाय. यात तो म्हणतो की, रोहित शर्मानं भारतीय संघासाठी १६ वर्ष दिली. पण आपण त्याला (BCCI निवड समिती) आणखी एक वर्ष देऊ शकलो नाही. २०२३ च्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनल सोडली तर रोहित शर्मानं ICC स्पर्धेत १६ पैकी १५ सामने जिंकले आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा जिंकली. फायनलमध्ये तो प्लेयर ऑफ द मॅच ठरला. या गोष्टीची आठवण करून देणारी आकडेवारी मांडत मोहम्मद कैफनं रोहित शर्माच्या नेतृत्वातील योगदानाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे म्हटले आहे.
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मोठेपण दाखवलं तरी...
आपल्याकडे चालतंय तोवरच चालवायचं अशी एक परंपरा आहे. पण रोहित शर्मानं तसं केलं नाही. टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा जिंकल्यावर त्याने नव्या चेहऱ्यांना संधी मिळावी, हा विचार करून क्रिकेटच्या या प्रकारातून निवृत्ती घेतली. तो प्रकाशझोतातून बाजूला झाला. त्याने आपल्या नेतृत्वाखाली खेळाडू तयार केले. अशा रोहित शर्माला कॅप्टन्सीच्या रुपात आपण एक वर्षे देऊ शकलो नाही, याची खंत कैफनं व्यक्त केली आहे.
एवढी घाई का?
ज्या रोहित शर्मानं ८ महिन्यांत २ आयसीसी ट्रॉफी जिंकून दिल्या त्याला गिल टेकओव्हर करतोय. युवा गिलमध्ये क्षमता आहे. तो चांगला कर्णधारही होईल.पण त्याच्याकडे अजून खूप वेळ होता.'छप्पर फाड के...' या धाटणीत बीसीसीआयने कसोटी पाठोपाठ त्याच्याकडे वनडेचं नेतृत्व सोपवलं आहे. ही वेळ रोहित शर्माची असताना गिलकडे ही जबाबदारी देण्याची एवढी घाई का? असा प्रश्नच कैफनं आगरकर अँण्ड कंपनीला विचारला आहे.