जबरदस्त! ICC च्या एकदिवसीय क्रमवारीत मिताली राज अव्वल

मिताली आणि ली यांचे प्रत्येकी ७६२ गुण आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 07:48 AM2021-09-15T07:48:47+5:302021-09-15T07:49:16+5:30

mithali raj tops ICC ODI rankings pdc | जबरदस्त! ICC च्या एकदिवसीय क्रमवारीत मिताली राज अव्वल

जबरदस्त! ICC च्या एकदिवसीय क्रमवारीत मिताली राज अव्वल

Next

दुबई : वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या सामन्यात दणदणीत अर्धशतक झळकावणाऱ्या दक्षिण आफ्रिकेची सलामीवीर लिजेल ली हिने मंगळवारी जाहीर झालेल्या नव्या आयसीसी एकदिवसीय फलंदाज क्रमवारीत भारताच्या मिताली राजसोबत संयुक्तपणे अव्वल स्थान पटकावले. लीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात नाबाद ९१ धावांची दमदार खेळी केली.

मिताली आणि ली यांचे प्रत्येकी ७६२ गुण आहेत. ऑस्ट्रेलियाची एलिसा हीली तिसऱ्या स्थानी विराजमान आहे. तसेच भारताची सलामीवीर स्मृती मानधना नवव्या स्थानी आहे. जून २०१८ मध्ये पहिल्यांदा क्रमवारीत स्थान पटकावलेल्या लीने मार्च महिन्यातही अव्वल स्थान पटकावले होते.

गोलंदाजी क्रमवारीत अनुभवी गोलंदाज झुलन गोस्वामी आणि फिरकीपटू पूनम यादव अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या स्थानी आहेत. तसेच अष्टपैलू क्रमवारीत दीप्ती शर्मा पाचव्या क्रमांकावर आहे. टी-२० क्रमवारीत शेफाली वर्मा अव्वल स्थानी असून तिच्यानंतर ऑस्ट्रेलियाची बेथ मूनी (७४४) आणि स्मृती मानधना (७१६) अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानी आहेत.
 

Web Title: mithali raj tops ICC ODI rankings pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app