Join us

आयसीसी क्रमवारीत मिताली राज अव्वल पाचमध्ये

२०१७ साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारताला अंतिम फेरी गाठून देण्यात मितालीचे योगदान मोलाचे ठरले होते

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2021 11:15 IST

Open in App

दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जाहीर केलेल्या ताज्या महिला एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीमध्ये भारताची कर्णधार मिताली राज हिने पाचवे स्थान मिळवले आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात केलेल्या ७२ धावांच्या खेळीच्या जोरावर मितालीने पाचवे स्थान काबीज केले.या सामन्यासह मितालीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २२ वर्षे पूर्ण केली.

२०१७ साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारताला अंतिम फेरी गाठून देण्यात मितालीचे योगदान मोलाचे ठरले होते. नव्या क्रमवारीत तिने तीन स्थानांनी झेप घेत पाचवे स्थान मिळवले. ऑक्टोबर २०१९ सालानंतर मितालीने पुन्हा एकदा अव्वल पाचमध्ये स्थान मिळवले आहे.

टॅग्स :आयसीसीमिताली राज