Join us

Mitchell Starc T20I Retirement : आगामी टी-२० वर्ल्ड कप आधी स्टार गोलंदाजाने घेतला निवृत्तीचा निर्णय; जाणून घ्या त्यामागचं कारण

Mitchell Starc T20I Retirement : आगामी टी-२० वर्ल्ड कप आधी ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघासाठी हा एक मोठा धक्काच आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 10:31 IST

Open in App

Mitchell Starc T20I Retirement :  ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज मिचेल स्टार्क याने मंगळवारी २ सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेट (T20I) मधून निवृत्तीची घोषणा केली आहे. कसोटी आणि आगामी वनडे वर्ल्ड कपवर लक्षकेंद्रीत करण्याच्या उद्देशाने ऑस्ट्रेलियन स्टार क्रिकेटरनं हा निर्णय घेतला आहे. पुढच्या वर्षी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. पण त्याआधीच त्याने करिअर आणखी लांब खेचण्यासाठी  छोट्या फॉरमॅटमधून थांबण्याला पसंती दिलीये. ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघासाठी हा एक मोठा धक्काच आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

टीम इंडियाविरुद्ध खेळला अखेरचा टी२०I सामना

३५ वर्षीय अनुभवी गोलंदाजाने २०२१ मध्ये संयुक्त अरब अमीरात (UAE) च्या मैदानात झालेल्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला टी-२० क्रिकेटमधील पहिला वहिला वर्ल्ड कप जिंकून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. २०२४ च्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाविरुद्ध तो अखेरचा आंतरराष्ट्रीय टी-२० सामना खेळला होता. स्टार्कनं ६५ सामन्यात ७९ विकेट्स घेतल्या आहेत. टी-२० मध्ये ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत ॲडम झाम्पा पाठोपाठ तो दुसऱ्या स्थानावर आहे.  

हा भारतीय गोलंदाज फिटनेस टेस्टमध्ये नापास; मॅच आधी आली संघातून 'आउट' होण्याची वेळ!

टी-२० कारकिर्दीत २०२१ ची टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा अविस्मरणीय

आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधील निवृत्तीसंदर्भात स्टार्क म्हणाला आहे की, ' मी नेहमीच कसोटी क्रिकेटला प्राथमिकता देतो. टी-२० क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधीत्व करताना आनंद घेतला. २०२१ ची टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण होता. फक्त जिंकलो म्हणून नव्हे तर सर्वोत्तम टीमचा भाग असणे हे त्यामागचे कारण आहे, असेही स्टार्कनं म्हटलं आहे. 

स्टार्क पुढे म्हणाला की, २०२७ मध्ये भारत दौऱ्यावरील कसोटी मालिकेसह अ‍ॅशेस आणि २०२७ चा वर्ल्ड कप स्पर्धेसाठी फिट राहायचं आहे. आगामी मोठ्या स्पर्धेसाठी ताजेतवाणे राहण्यासाठी हा निर्णय सर्वोत्तम वाटतो, असे म्हणत त्याने छोट्या फॉरमॅटपेक्षा मोठ्या फॉरमॅटमध्ये धमाका करण्यावर फोकस करतोय, ही गोष्टही बोलून दाखवली आहे. 

 

टॅग्स :आॅस्ट्रेलिया