"त्याने महिला अंपायरसोबत...", मिचेल जॉन्सनशी झालेल्या भांडणानंतर ऑस्ट्रेलियाने युसूफ पठाणवर केले गंभीर आरोप

लीजेंड्स लीग क्रिकेट क्वालिफायर सामना रविवारी म्हणजेच २ ऑक्टोबर रोजी खेळला गेला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2022 01:53 PM2022-10-05T13:53:29+5:302022-10-05T13:54:03+5:30

whatsapp join usJoin us
Mitchell Johnson furious after Yusuf Pathan sledging with female umpire, says that australian player  | "त्याने महिला अंपायरसोबत...", मिचेल जॉन्सनशी झालेल्या भांडणानंतर ऑस्ट्रेलियाने युसूफ पठाणवर केले गंभीर आरोप

"त्याने महिला अंपायरसोबत...", मिचेल जॉन्सनशी झालेल्या भांडणानंतर ऑस्ट्रेलियाने युसूफ पठाणवर केले गंभीर आरोप

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : लीजेंड्स लीग क्रिकेट मधील क्वालिफायर सामना रविवारी म्हणजेच २ ऑक्टोबर रोजी खेळला गेला. या सामन्यात युसूफ पठाण आणि ऑस्ट्रेलियाचा दिग्गज मिचेल जॉन्सन विरुद्ध भारतीय संघ यांच्यात जोरदार धक्काबुकी झाली. हा सामना भिलवाडा किंग्ज आणि इंडिया कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला, जिथे या दोघांमध्ये बाचाबाची झाली. आता यावरूनच ऑस्ट्रेलियाने एक विधान करून पठानवर गंभीर आरोप केले आहेत. 

ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूचा गंभीर आरोप
ऑस्ट्रेलियाकडून नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, युसूफ पठाणने महिला अंपायरची स्लेजिंग केली होती. खरं तर जॉन्सनच्या तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू अंपायरने वाईड घोषित केला नव्हता. त्यामुळे युसूफ पठाणने महिला अंपायर किम कॉटनला स्लेजिंग केले आणि हे पाहून मिशेल संतापला. ऑस्ट्रेलियाच्या एका खेळाडूने नाव न सांगण्याच्या अटीवर फॉक्स क्रिकेट ऑस्ट्रेलियाला याबाबत माहिती दिली. "मिचेल जॉन्सनने काहीही केले नाही. पठाण महिला अंपायरसोबत वाद घालत होता. त्यानंतर हे सर्व घडले", असे ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूने सांगितले.

या जोरदार धक्काबुक्कीनंतर मिचेल जॉन्सनने युसूफ पठाणला काहीतरी सांगितले, ज्याला पठाणने उत्तर दिले. यादरम्यान दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली, परंतु मिशेल जॉन्सनने युसूफ पठाणला धक्काबुक्की केल्याचा व्हिडीओ समोर आला होता. सुदैवाने दोघांमधील वाद काही वेळातच संपुष्टात आला. 

मिचेल जॉन्सनला ठोठावला दंड 
दोन्ही खेळाडूंचा वाद सोडवण्यासाठी अंपायर आणि बाकीच्या खेळाडूंनी मध्यस्थी केली. तसेच लीजेंड्स लीग क्रिकेटचे सह-संस्थापक आणि सीईओ रमण रहेजा त्यांच्या संघर्षामुळे खूपच निराश दिसले. मात्र हा वाद जॉन्सनच्या चांगलाच आंगलट आला. कारण भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी शिक्षा म्हणून जॉन्सनला मॅच फीच्या ५० टक्के दंड ठोठावला आहे.

 

Web Title: Mitchell Johnson furious after Yusuf Pathan sledging with female umpire, says that australian player 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.