Join us

मी क्रिकेटला कलंकित केलं; डेव्हिड वॉर्नरने मागितली माफी

ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरने आपली चूक मान्य केली आहे. त्याचबरोबर त्याने साऱ्यांची माफी मागितली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2018 13:23 IST

Open in App
ठळक मुद्देबीसीसीआयने बंदी घातल्यामुळे त्याला यंदाच्या आयपीएलमध्ये खेळता येणार नाही.

 नवी दिल्ली : चेंडूशी छेडछाड करण्यामागे मुख्य सूत्रधार असलेला ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरने आपली चूक मान्य केली आहे. त्याचबरोबर त्याने साऱ्यांची माफी मागितली आहे.

" मी क्रिकेटला कलंकित केले आहे. या गोष्टीची मला जाणीव झाली आहे. त्यामुळे मी या साऱ्या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारतो आणि तुम्हा साऱ्यांची माफी मागतो, " असे वॉर्नरने आपल्या ट्विटरवर म्हटले आहे.

चेंडूशी छेडछाड केल्यानंतर वॉर्नरवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एका सामन्याची बंदी घातली आहे. त्याचबरोबर त्याला बीसीसीआयने बंदी घातल्यामुळे त्याला यंदाच्या आयपीएलमध्ये खेळता येणार नाही. त्याचबरोबर त्याला यापुढे ऑस्ट्रेलियाचे कर्णधारपदही भूषवता येणार नाही.

टॅग्स :डेव्हिड वॉर्नरचेंडूशी छेडछाड