दुबई : पाकिस्तानला सहजपणे धूळ चारल्यानंतर ‘सुपर फोर’च्या पहिल्या सामन्यात शुक्रवारी भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध खेळेल. मोठ्या संघाला हरविण्याची क्षमता बाळगणाऱ्या या संघाविरुद्ध खेळताना विजयी लय कायम राखण्याचे भारतापुढे आव्हान असेल.भारताची सर्वात मोठी अडचण असेल ती संघ निवडीची. हार्दिक पांड्या कंबरेच्या दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर झाला, तर हाँगकाँग आणि पाकविरुद्ध सलग दोन सामने खेळल्यामुळे भुवनेश्वर कुमारला विश्रांती दिली जाऊ शकते. अक्षर पटेल आणि शार्दुल ठाकूर हेही दुखापतीमुळे बाहेर झाल्याने अडचणीत मोठी भर पडली. डावखुरा वेगवान गोलंदाज खलील अहमद याला भुवनेश्वरऐवजी अंतिम एकादशमध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे. अक्षरचे स्थान रवींद्र जडेजा आणि शार्दुलचे स्थान सिद्धार्थ कौल घेणार असल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले. पांड्याचा पर्याय म्हणून दीपक चाहरला संघात घेण्यात आले, पण तो थेट सामना खेळण्याची शक्यता कमीच आहे.मनीष पांडे याला मधल्या फळीत संधी दिली जाणार असून रोहित शर्मा, शिखर धवन, अंबाती रायुडू आणि दिनेश कार्तिक हे पहिल्या चार स्थानांवर कायम राहतील. धोनीला कुठल्या स्थानावर पाठविले जाते, हे पाहणे रंजक ठरेल.एकदिवसीय सामन्यात बांगलादेश संघ चांगलाच खेळतो. २०१२ च्या आशिया चषकात त्यांनी अंतिम फेरी गाठली होती. कर्णधार मुशर्रफ मुर्तझाच्या मार्गदर्शनात मुशफिकूर रहीम, साकीब अल हसन आणि महमदुल्लाह रियाध हे संघाला बळकटी प्रदान करू शकतात. मुस्तफिजूर रहमान आणि रुबेल हुसेन, मूर्तजा आणि साकीब हे अनुभवी गोलंदाज भारतीय फलंदाजीला खिंडार पाडू शकतात. एकूणच हा सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे. (वृत्तसंस्था)>हार्दिक, अक्षर, शार्दुल स्पर्धेबाहेरकंबरेच्या दुखण्यामुळे अष्टपैलू हार्दिक पांड्या आशिया चषकातून बाहेर पडला. त्याची जागा दीपक चाहर घेईल. त्याचवेळी, फिरकीपटू अक्षर पटेल व वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर हेही दुखापतीमुळे बाहेर आहे. अक्षरच्या डाव्या बोटाला इजा झाली असून शार्दुलच्या जांघेवर सूज आली आहे.>प्रतिस्पर्धी संघ :भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, अंबाती रायुडू, दिनेश कार्तिक, महेंद्रसिंग धोनी, मनीष पांडे, केदार जाधव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद, सिद्धार्थ कौल, कुलदीप यादव, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, रवींद्र जडेजा आणि दीपक चाहर.बांगलादेश : मुशर्रफमुर्तझा (कर्णधार), साकीब अल हसन, तमीम इक्बाल, मोहम्मद मिथून, लिट्टन दास, मुशफिकूर रहीम, आरिफूल हक, महमूदुल्लाह मोसादेक, हुसैन सेकत, नजमुल हुसेन शंटो, मेहदी हसन मिराज, नजमुल इस्लाम अपु, रुबेल हुसेन, मुस्तफिजूर रहमान आणि अबू हैदर.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- Asia Cup 2018 : बलाढ्य भारतीय संघ आज बांगलादेशविरुद्ध भिडणार
Asia Cup 2018 : बलाढ्य भारतीय संघ आज बांगलादेशविरुद्ध भिडणार
पाकिस्तानला सहजपणे धूळ चारल्यानंतर ‘सुपर फोर’च्या पहिल्या सामन्यात शुक्रवारी भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध खेळेल.
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2018 02:14 IST