MI vs RR Latest News : रोहित शर्मा राजस्थान रॉयल्सविरुद्ध मोठा विक्रम मोडणार; सुरेश रैनाला मागे सोडणार

मुंबई इंडियन्सचा ( Mumbai Indians) कर्णधार रोहित शर्माला ( Rohit Sharma) आज राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात ( Rajasthan Royals) एक विक्रम खुणावत आहे.

By स्वदेश घाणेकर | Published: October 6, 2020 03:51 PM2020-10-06T15:51:34+5:302020-10-06T15:52:52+5:30

whatsapp join usJoin us
MI vs RR Latest News : Rohit Sharma on cusp of surpassing Suresh Raina in elite list, could achieve milestone against RR | MI vs RR Latest News : रोहित शर्मा राजस्थान रॉयल्सविरुद्ध मोठा विक्रम मोडणार; सुरेश रैनाला मागे सोडणार

MI vs RR Latest News : रोहित शर्मा राजस्थान रॉयल्सविरुद्ध मोठा विक्रम मोडणार; सुरेश रैनाला मागे सोडणार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई इंडियन्सचा ( Mumbai Indians) कर्णधार रोहित शर्माला ( Rohit Sharma) आज राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात ( Rajasthan Royals) एक विक्रम खुणावत आहे. Indian Premier League ( IPL 2020) मध्ये आज अबु धाबी येथे MI vs RR असा सामना रंगणार आहे. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत पाचपैकी 3 सामन्यांत विजय मिळवले आहेत आणि आज विजय मिळवून पुन्हा अव्वल स्थान पटकावण्याचे त्यांचे लक्ष्य आहे. त्यांनी सलग दोन सामने जिंकले आहेत आणि विजयाची हॅटट्रिक साजरी करण्यासाठी रोहित अँड टीम सज्ज आहे. MI vs RR Latest News & Live Score 

या सामन्यात रोहित शर्मा एका विक्रमाला गवसणी घालणार आहे. रोहितनं यंदाच्या आयपीएलमध्ये पाच सामन्यांत दोन अर्धशतकी खेळी केली आहे आणि आज त्यानं अर्धशतक केल्यात तो सुरेश रैनाचा IPLमधील सर्वाधिक अर्धशतकांचा विक्रम मोडणार आहे. या दोघांच्या नावावर प्रत्येकी 38 अर्धशतकं आहेत आणि आज रोहितची बॅट तळपल्यास तो IPLमध्ये सर्वाधिक अर्धशतक करणारा भारतीय खेळाडू बनेल. सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर 131 सामन्यांत 45 अर्धशतकांसह अव्वल स्थानावर आहे. त्यानंतर रोहितचाच क्रमांक येतो. MI vs RR Latest News & Live Score 

शिवाय IPLमध्ये सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रमातही रोहित - सुरेश रैना बरोबरीत आहेत. दोघांच्या नावावर 193 IPL सामने आहेत. आजच्या सामन्यात रोहित हाही विक्रम मोडणार आहे. वैयक्तिक कारणामुळे सुरेश रैनानं आयपीएलमधून माघार घेतली आहे. चेन्नई सुपर किंग्सचा ( CSK) कर्णधार महेंद्रसिंग धोनी या विक्रमात 195 सामन्यांसह आघाडीवर आहे. रोहितनं 193 सामन्यांत 5074 धावा केल्या आहेत. IPLमध्ये 5000 धावा करणारा तो विराट व रैनानंतर तिसरा खेळाडू आहे. यंदाच्या पर्वात रोहितनं 5 सामन्यांत 176 धावा केल्या आहेत. त्यात 80 व 70 धावांच्या खेळीचा समावेश आहे. MI vs RR Latest News & Live Score 

 

 

Web Title: MI vs RR Latest News : Rohit Sharma on cusp of surpassing Suresh Raina in elite list, could achieve milestone against RR

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.