Join us
Daily Top 2Weekly Top 5

MI vs RCB Latest News : बुमराहने केले आयपीएल बळींचे शतक; पहिला आणि शंभरावा बळी कोहलीच

MI vs RCB Latest News : मुंबई इंडियन्सचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह याने रॉयल चँलेंजर्स बंगलुरू विरोधातील सामन्यात आपले आयपीएल बळींचे शतक पुर्ण केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2020 22:06 IST

Open in App

मुंबई इंडियन्सचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह याने रॉयल चँलेंजर्स बंगलुरू विरोधातील सामन्यात आपले आयपीएल बळींचे शतक पुर्ण केले आहे. त्याने ८९ सामन्यात १०२ बळी घेतले आहे. आजच्या सामन्यात त्याने तीन बळी घेतले आहे. त्यासोबतच त्याने १०२ बळी मिळवण्याच्या जहीर खान याच्या कामगिरीची बरोबरी केली. 

आयपीएलमध्ये बळींचे शतक पुर्ण करणारा तो १६ वा गोलंदाज ठरला. बुमराह हा सुरूवातीपासून मुंबई इंडियन्सकडून खेळतो. त्याने त्याच्या नेहमीच संघासाठी शानदार गोलंदाजी करताना बळी घेतले आहे. नियमीत कर्णधार रोहित शर्मा च्या अनुपस्थितीत झालेल्या या सामन्यात त्याने ही कामगिरी केली. बुमराहची विराट कामगिरी बुमराहच्या कारकिर्दीतील योगायोग म्हणजे त्याने २०१३ च्या सत्रात आयपीएलमध्ये आरसीबी विरोधातच पर्दापण केले होेते. त्यावेळी त्याने विराट कोहलीच्या रुपाने आपला पहिला बळी मिळवला होता. तर त्या सामन्यात त्याने ३२ धावा देत कोहली, मयांक अग्रवाल आणि करुण नायर यांना बाद केले होते.

आता ८९ व्या सामन्यात त्याने आपला शंभरावा बळी कोहलीच्या रुपानेच मिळवला. आणि या सामन्यातही त्याने ४ षटकांत १४ धावा देत तीन गडी बाद केले. त्याने या सामन्यात देवदत्त पड्डीकल, कोहली आणि शिवम दुबे यांना बाद केले.      

टॅग्स :IPL 2020जसप्रित बुमराहमुंबई इंडियन्सविराट कोहलीरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर