MI vs RCB : सिराज-कार्तिकच्या धडकेनं रोहितला दिलं जीवदान; पण सोप्या चेंडूवर हिटमॅन झाला चीतपट

MI vs RCB IPL 2023 T20 Cricket Match Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या १६व्या पर्वातील पाचवा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळवला जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2023 08:08 PM2023-04-02T20:08:04+5:302023-04-02T20:08:27+5:30

whatsapp join usJoin us
 MI vs RCB IPL 2023 T20 Cricket Match Live Updates Mumbai Indians skipper Rohit Sharma was given the torch by Mohammad Siraj and Dinesh Karthik but was dismissed by hitman Aksh Deep on an easy delivery  | MI vs RCB : सिराज-कार्तिकच्या धडकेनं रोहितला दिलं जीवदान; पण सोप्या चेंडूवर हिटमॅन झाला चीतपट

MI vs RCB : सिराज-कार्तिकच्या धडकेनं रोहितला दिलं जीवदान; पण सोप्या चेंडूवर हिटमॅन झाला चीतपट

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

MI Vs RCB 2023 Live Score । बंगळुरू : इंडियन प्रीमिअर लीगच्या १६व्या पर्वातील पाचवा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळवला जात आहे. मुंबईकडून सलामीला आलेल्या इशान किशनला सुरूवातीपासून मोहम्मद सिराजने अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. सिराजचे चेंडू खेळण्यात अपयश येत असलेला किशन १३ चेंडूत १० धावा करून तंबूत परतला. तर आर टोपलेने मुंबईचा स्फोटक फलंदाज कॅमेरून ग्रीनचा त्रिफळा काढला. खरं तर मुंबईचा कर्णधार रोहित शर्मालामोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर एक जीवदान मिळाले. रोहितने मारलेला चेंडू हवेत जाताच कार्तिक अन् सिराज झेल घेण्यासाठी धावले असता दोघांची धडक झाली आणि रोहितला जीवदान मिळाले.

मात्र, जीवदान मिळाल्यानंतर रोहित शर्माला संधीचा फायदा घेता आला नाही. त्याला नवखा गोलंदाज अक्श दीपने १ धावेवर बाद केले. ५.२ षटकांपर्यंत अवघ्या २० धावांवर मुंबईने आपले ३ फलंदाज गमावले. अखेर रोहित १० चेंडूत १ धाव करून बाद झाला.

 

दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने नाणेफेक जिंकून रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सचा संघ मागील वर्षीची निराशाजनक खेळी विसरून मैदानात उतरला आहे. तर फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वात आरसीबीचा संघ आयपीएलच्या जेतेपदाचा दुष्काळ मिटवण्याच्या इराद्याने उतरला आहे. जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत मुंबईच्या गोलंदाजीची धुरा इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरच्या खांद्यावर आहे. 

मुंबई इंडियन्सचे विदेशी खेळाडू - 
टिम डेव्हिड, कॅमेरॉन ग्रीन, जोफ्रा आर्चर आणि जेसन बेहरेनडॉर्फ.

आरसीबीचे विदेशी खेळाडू - 
फाफ डू प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल, मायकेल ब्रेसवेल आणि रीस टोपले.


 
आजच्या सामन्यासाठी मुंबई इंडियन्सचा संघ - 
रोहित शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव, कॅमेरून ग्रीन, टिळक वर्मा, डेव्हिड, नेहल वढेरा, शोकीन, चावला, जोफ्रा आर्चर आणि अर्शद खान.

आजच्या सामन्यासाठी आरसीबीचा संघ - 
फाफ डू प्लेसिस, विराट कोहली, मायकेल ब्रेसव्हेल, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज, दिनेश कार्तिक, हर्षल पटले, टोपले, आकाश दीप, कर्ण आणि मोहम्मद सिराज.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"  

 

 

Web Title:  MI vs RCB IPL 2023 T20 Cricket Match Live Updates Mumbai Indians skipper Rohit Sharma was given the torch by Mohammad Siraj and Dinesh Karthik but was dismissed by hitman Aksh Deep on an easy delivery 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.