MI Vs RCB 2023 Live Score । बंगळुरू : इंडियन प्रीमिअर लीगच्या १६व्या पर्वातील पाचवा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळवला जात आहे. मुंबईकडून सलामीला आलेल्या इशान किशनला सुरूवातीपासून मोहम्मद सिराजने अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. सिराजचे चेंडू खेळण्यात अपयश येत असलेला किशन १३ चेंडूत १० धावा करून तंबूत परतला. तर टोपलेने मुंबईचा स्फोटक फलंदाज कॅमेरून ग्रीनचा (५) त्रिफळा काढून प्रतिस्पर्धी संघाला आणखी एक धक्का दिला.
दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने नाणेफेक जिंकून रोहित शर्माच्यामुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सचा संघ मागील वर्षी निराशाजनक खेळी विसरून मैदानात उतरला आहे. तर फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वात आरसीबीचा संघ आयपीएलच्या जेतेपदाचा दुष्काळ मिटवण्याच्या इराद्याने उतरला आहे. जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत मुंबईच्या गोलंदाजीची धुरा इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरच्या खांद्यावर आहे.
मुंबई इंडियन्सचे विदेशी खेळाडू -
टिम डेव्हिड, कॅमेरॉन ग्रीन, जोफ्रा आर्चर आणि जेसन बेहरेनडॉर्फ.
आरसीबीचे विदेशी खेळाडू -
फाफ डू प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल, मायकेल ब्रेसवेल आणि रीस टोपले.
आजच्या सामन्यासाठी मुंबई इंडियन्सचा संघ - रोहित शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव, कॅमेरून ग्रीन, टिळक वर्मा, डेव्हिड, नेहल वढेरा, शोकीन, चावला, जोफ्रा आर्चर आणि अर्शद खान.
आजच्या सामन्यासाठी आरसीबीचा संघ -
फाफ डू प्लेसिस, विराट कोहली, मायकेल ब्रेसव्हेल, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज, दिनेश कार्तिक, हर्षल पटले, टोपले, आकाश दीप, कर्ण आणि मोहम्मद सिराज.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"