Join us  

MI vs KXIP Latest News : रोहित शर्माचा चौकार अन् नोंदवला मोठा विक्रम; विराट कोहली, सुरेश रैनाच्या पंक्तित स्थान

रोहित शर्मा ( Rohit Sharma) आणि लोकेश राहुल ( KL Rahul) यांच्यात आज धावांचा पाऊस कोण पाडतो, याची सर्वांना उत्सुकता आहेच. शिवाय, KXIPच्या फॉर्मात असलेल्या फलंदाजांना रोखण्याचं आव्हान जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) अँड टीमला पेलावं लागणार आहे. मोहम्मद शमी (  Mohammed Shami) आज सर्व अनुभव पणाला लावेल. 

By स्वदेश घाणेकर | Published: October 01, 2020 7:25 PM

Open in App

MI vs KXIP Latest News : गतविजेता मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab) यांच्यात अबु धाबी येथे सामना रंगत आहे. दोन्ही संघांना मागच्या सामन्यात प्रतिस्पर्धींकडून पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे IPL 2020त पुन्हा विजयपथावर येण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्नशील आहेत.

किंग्स इलेव्हन पंजाबचा कर्णधार लोकेश राहुलनं ( KL Rahul) नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. KXIPनं आजच्या सामन्यात एम अश्विनच्या जागी के गोवथमला संधी दिली आहे आणि मुंबई इंडियन्सनं मागच्या सामन्यातील संघ कायम राखला आहे. या सामन्यात रोहित शर्मानं ( Hitman) दुसरी धाव घेताच एका विक्रमाला गवसणी घातली. रोहितनं पहिल्याच चेंडूवर चौकार मारला अन् विक्रम नोंदवला.

  • Kings XI Punjab Team - लोकेश राहुल, मयांक अग्रवाल, ग्लेन मॅक्सवेल, निकोलस पूरन, करुण नायर, जिमी निशॅम, के गोवथम, एस खान, मोहम्मद शमी, शेल्डन कॉट्रेल, रवी बिश्नोई 
  • Mumbai Indians Team - रोहित शर्मा, क्विंटन डी'कॉक, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पांड्या, किरॉन पोलार्ड, जेम्स पॅटिसन्स, राहुल चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह

 

  • अबु धाबीतील विक्रम
  • KXIP - दोन सामने, दोन विजय
  • MI - तीन सामने, एक विजय, दोन पराभव

 

अपेक्षित विक्रम -

  1. मयांक अग्रवालला IPLमधील 1500 धावांचा पल्ला गाठण्यासाठी आज 13 धावा बनवाव्या लागतील
  2. लोकेश राहुलने आज 26 धावा करताच KXIPकडून तो 1500 धावा पूर्ण करेल
  3. सूर्यकुमार यादवला षटकारांचे अर्धशतक पूर्ण करण्यासाठी दोन उत्तुंग फटके मारावे लागतील

 

आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारे दहा फलंदाज

  1. विराट कोहली - 180 सामने, 5430 धावा
  2. सुरेश रैना - 193 सामने, 5368 धावा
  3. रोहित शर्मा - 192 सामने, 5000* धावा
  4. डेव्हिड वॉर्नर - 129 सामने, 4793 धावा
  5. शिखर धवन - 162 सामने, 4648 धावा
  6. एबी डिव्हिलियर्स - 157 सामने, 4529 धावा
  7. ख्रिस गेल - 125 सामने, 4484 धावा
  8. महेंद्रसिंग धोनी - 193 सामने, 4476 धावा
  9. रॉबिन उथप्पा - 180 सामने, 4427 धावा
  10. गौतम गंभीर - 154 सामने, 4217 धावा 
टॅग्स :IPL 2020रोहित शर्मामुंबई इंडियन्सकिंग्स इलेव्हन पंजाबविराट कोहलीसुरेश रैना